भटक्या कुत्र्यांमध्ये मायक्रोचिप तंत्रज्ञान वापरण्याचा महापालिकेचा मानस

भटक्या कुत्र्यांमध्ये मायक्रोचिप तंत्रज्ञान वापरण्याचा महापालिकेचा मानस
पुणे : पुढारी वृत्तसेवा : भटक्या कुत्र्यांचे लसीकरण आणि नसबंदी वाढवण्यासाठी महापालिकेतर्फे विशेष प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून भटक्या कुत्र्यांमध्ये सेन्सर असलेली मायक्रोचिप बसवण्याचा महापालिकेचा मानस आहे. यामुळे लसीकरणाची नोंद ठेवणे, कुत्र्यांची गणना करणे शक्य होऊ शकेल. पुणे शहर रेबीजमुक्त करण्यासाठी महापालिकेतर्फे विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. यामध्ये कुत्र्यांच्या त्वचेमध्ये इंजेक्शनच्या आकाराची अत्यंत छोट्या आकाराची मायक्रोचिप बसवण्याचा विचार सुरु आहे.
मायक्रोचिपमध्ये स्कॅनर समाविष्ट असणार आहे. चिप मोबाईल अ‍ॅप्लिकेशनशी जोडली जाणार आहे. कोणत्या भागामधील किती कुत्र्यांचे लसीकरण झाले आहे, पुन्हा कधी करायचे आहे याबाबतचे मेसेज महापालिकेच्या आरोग्य विभागाला अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून मिळू शकतील. त्याप्रमाणे लसीकरणामध्ये नियमितता आणली जाईल. मायक्रोचिपमध्ये कुत्र्याचा रंग, लिंग आदी माहितीचा समावेश केला जाईल. चिपच्या तंत्रज्ञानामुळे शहरासह समाविष्ट गावांमधील कुर्त्यांची नव्याने गणना करणे शक्य होणार आहे. जयपूरमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करुन सुमारे 25 हजार भटक्या कुर्त्यांमध्ये मायक्रो चिप बसवण्यात आली आहे. चिपमध्ये वापरण्यात आलेले मटेरियल शरीरास अपायकारक नसल्याची आणि त्यामुळे कुत्र्यांना कोणतीही इजा होणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे.
शहरातील भटक्या आणि मोकाट कुर्त्यांची नसबंदी शस्त्रक्रिया व लसीकरणासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. त्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मायक्रोचिपचे तंत्रज्ञानाचा प्रस्ताव मिळाला आहे. या तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करायची की नाही, याबाबतचा निर्णय अद्याप विचाराधीन आहे.
– रवींद्र बिनवडे, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका

रेबीजमुक्त मोहीम कशी असेल?

  • दररोज प्रत्येक संस्थेकडून 10 कुत्र्यांचे नमुने रेबीज आजार तपासणीसाठी  पाठविण्यात येणार
  • महापालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या गावामधील भटक्या व मोकाट कुर्त्यांची गणना करणार
  • भटक्या कुत्र्याच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी एका गाडीची नियुक्ती सर्व पशुवैद्यकीय दवाखान्याची नोंदणी करण्यात येणार
  • तीन खासगी संस्थांची नेमणूक करणार

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news