पुणे : पुढारी वृत्तसेवा : रेल्वे प्रशासनाने पुणे विभागातील 11 रेल्वे क्रॉसिंग फाटके आत्तापर्यंत कायमची बंद केली आहेत. या फाटकांऐवजी रेल्वे प्रशासनाने वाहनचालक आणि रेल्वे ट्रॅकजवळ राहणार्या स्थानिक नागरिकांसाठी रोड ओव्हर ब्रीज, रोड अंडर ब्रीज बांधून उपाय योजना केल्या आहेत. रेल्वेच्या पुणे विभागाने एप्रिल 2023 पासून विभागातील 11 रेल्वे फाटके बंद करण्याची ही कार्यवाही केली. त्यामुळे रेल्वे फाटकांवर होणारे अपघात कमी झाले असून, रेल्वे गाड्यांचा वेग वाढला आहे. तसेच, गाड्यांना होणारा उशीर देखील काही प्रमाणात कमी झाला आहे.