Pune : तरुणांचा सायकलवारीतून आरोग्यदायी संदेश | पुढारी

Pune : तरुणांचा सायकलवारीतून आरोग्यदायी संदेश

पारगाव : पुढारी वृत्तसेवा :  रांजणी (ता. आंबेगाव) येथील काही तरुणांनी निरोगी आरोग्यासाठी जनजागृती सुरू केली आहे. या अंतर्गत डॉ. संजय वाघ आणि शरद वाघ या दोन तरुणांनी नुकताच रांजणी ते कन्याकुमारी असा 1539 किलोमीटर प्रवास नुकताच करून ’सायकल चालवा आणि निरोगी रहा’ असा संदेश दिला. डॉ. संजय वाघ व शरद वाघ यांनी रांजणी (कारमळा) येथील श्री विठ्ठल- रुक्मिणीचे दर्शन घेऊन सायकलवारीला प्रारंभ केला. यामध्ये कोल्हापूर, कागल, येलापूर (कर्नाटक), कोझीकोडा (केरळ), पारिपल्ली (केरळ) असा प्रवास करत सहा दिवसांत 1539 किलोमीटर अंतर पार करून ते कन्याकुमारी येथे पोहचले.

या प्रवासादरम्यान भेटणार्‍या प्रत्येक व्यक्तीला त्यांनी ’सायकल चालवा निरोगी राहा’ असा संदेश दिला. आत्तापर्यंत या दोघांनी तिरुपती बालाजी, गिरनार पर्वत (गुजरात), त्रिंबकेश्वर, भीमाशंकर, पंढरपूर, कोल्हापूर आदी ठिकाणी सायकल स्वारी करत 5 हजार किमी प्रवास केला आहे

सध्या तरुणांची जीवनशैली बदलली आहे. त्यांना नियमित व्यायामाची आवश्यकता आहे. यासाठी रांजणी, कारफाटा, नागापूर, वळती, भराडी या गावांमधील तरुणांनी सुप्रभात स्विमिंग, ट्रेकिंग ग्रुप तयार केला आहे. या माध्यमातून सायकल वारी, ट्रेकिंगचे नियमित आयोजन केले जाते.
                                       – राजेश थोरात, सदस्य, सुप्रभात स्विमिंग ग्रुप

Back to top button