रोहितच्या वयात शरद पवार मुख्यमंत्री होते : खासदार सुप्रिया सुळे | पुढारी

रोहितच्या वयात शरद पवार मुख्यमंत्री होते : खासदार सुप्रिया सुळे

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वय 65 च्या घरात आहे. त्याच्यामुळे अजितदादा ‘सीनियर सिटिझन’ आहेत. ते रोहित पवार यांना काकाच्या नात्याने ‘बच्चा” बोलले, असे मत बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. रोहितच्या वयात शरद पवार मुख्यमंत्री होते, असेही त्यांनी म्हटले आहे. खासदार सुळे यांनी सोमवारी (दि. 8) पुणे श्रमिक पत्रकार संघामध्ये पत्रकार परिषद घेऊन विविध विषयांवर आपली मते स्पष्ट केली.

वय 84 झाले तरीही काही लोक थांबायला तयार नाहीत, या अजित पवार यांच्या शरद पवारांवरील टीकेवर सुळे म्हणाल्या, लोकशाहीमध्ये सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे. कोणी काय बोलावे, हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. मात्र, पवारसाहेबांनी दादांचे कोणकोणते हट्ट पुरविले, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. ते ज्या पद्धतीने म्हणतात, ‘मी सोळा तास काम करतो’, त्याच पद्धतीने आम्हीही सोळा-सोळा तास काम करतो. मात्र, माध्यमांसमोर येऊन बोलणं हा आमचा जॉब नाही, असेही सुळे म्हणाल्या.

हेही वाचा

Back to top button