धनु : वार्षिक भविष्य २०२४ : पूर्वार्ध सर्व क्षेत्रांत प्रगतीचा | पुढारी

धनु : वार्षिक भविष्य २०२४ : पूर्वार्ध सर्व क्षेत्रांत प्रगतीचा

होराभूषण रघुवीर खटावकर

धनु राशीचा स्वामी गुरू, पुरुष रास, द्वि-स्वभाव, बोधचिन्ह- अर्धे शरीर घोड्याचे आणि अर्धे चेहऱ्यासहीत मनुष्याचे शरीर, हातात धनुष्यबाण व बाण सोडण्याच्या पवित्र्यात! राशीत मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा (१ चरण) अशी नक्षत्रे आहेत. राशीस्वामी गुरू हा केवळ आकाशतत्त्वाचा आहे. धनुराशी अग्नी तत्त्वाचे आणि पहिले मूळ नक्षत्र हे केतूचे असून, त्यात ११ तारे आहेत. केतू हा अग्नी व आकाश तत्त्वाचा आहे. त्यामुळे मूळ नक्षत्रावर जन्म असेल तर अशा व्यक्ती बलवान, धार्मिक, आध्यात्मिक क्षेत्रात नेहमी पुढे असतात.
वर्षभर नेपच्यून व राहू मीनेत (राशीला ४ था), प्लुटो मकरेत (राशीला २ रा) तर शनी कुंभेत (राशीला ३ रा) राहील.

नेपच्यून राहूमुळे मतभेद झाल्यामुळे गृहसौख्य बिघडू शकते.
आईच्या आजारपणाचे स्वरूप गंभीर राहू शकेल. प्रॉपर्टीच्या कामांत गुंतागुंत राहील. कौटुंबिक खर्च प्लुटोमुळे मोठ्या प्रमाणावर वाढेल. धंद्यातील परिस्थिती गंभीर बनेल.

शनी मूल त्रिकोण राशीत स्थानबल आहे. चांगले नियोजन, चिकाटीच्या जोरावर पूर्वार्धात गुरू-हर्षल अनुकूल असल्यामुळे अचानक वरचा दर्जा मिळवाल. शिक्षणात लक्षणीय प्रगती होईल. विवाह जुळेल. आर्थिक प्राप्ती वाढेल. आत्मविश्वास चांगला राहील. गुरुकृपा राहील. संततीवर प्रेम राहील. आर्थिक लाभासाठी खूप उलाढाली कराल.

मेनंतर गुरू व जूननंतर हर्षल राशीच्या षष्ठस्थानी राहील. गृहसौख्यात बाधा येत राहील. अपेक्षेप्रमाणे कामाचे कौतुक होणार नाही.
मंगळ वृषभेत जुलै-ऑगस्टमध्ये असताना विपरीत घटनातून लाभ होईल. विसरभोळेपणामुळे नुकसान होईल.
शुक्र मेमध्ये वृषभेत असतानाही विपरीत राजयोगामुळे विपरीत घटनेतून लाभ होईल. असा योग शुक्र कर्केत जुलैमध्ये येईल व अचानक धनलाभ होईल. शुक्र ऑक्टो- नोव्हें. मध्ये वृश्चिकेत राशीला १२ वा असतानाही विपरीत घटनेतून लाभ होईल. पण, कायदेशीर बाबीमुळे अडचणीतही येऊ शकाल.

मंगळ कुंभेत (मार्च-एप्रिल), वृषभेत (जुलै-ऑगस्ट) असताना आरोग्य चांगले राहील. सुवर्णालंकारांचा लाभ होईल. मार्च- एप्रिलमध्ये मंगळ-शनी गृहसौख्य बिघडवतील. जून, जुलै, ऑगस्टमध्ये शनी, प्लुटोच्या केंद्रात असताना जोखमीची कामे करताना काळजी घ्यावी. ऑक्टो-नोव्हें.- डिसें. मध्ये मंगळ कर्केत असताना प्रॉपर्टीची शेतीवाडीची कामे होतील; पण अपमानाचे प्रसंग येतील.
बुध सिंह राशीत (जुलै-ऑगस्ट) असताना सारासार विचार करावा.

सदसद्विवेकबुद्धी जागृत ठेवावी. कामासाठी प्रवास घडेल. बुध जानेवारीला धनु राशीत असताना बोलताना जिभेवर नियंत्रण ठेवावे. माणसे दुखावली जातील.

रवी राशीला ३ रा फेब्रु. मार्च असताना विकास योजना यशस्वीपणे राबवाल. रवी राशीला ६ वा (एप्रिल-मे) असताना एखादी चांगली संधी कमी श्रमात लाभ होऊन कामात यश मिळेल. रवी राशीला १० वे ११ वे सप्टें. – ऑक्टोबर-नोव्हें. असताना कर्माला भाग्याची जोड लाभेल. कामात यश मिळेल व कामाचा मोबदला मिळेल. रवी राशीला ४था (मार्च- एप्रिल) असताना उगाच घरगृहस्थीची काळजी कराल. रवी राशीला ८ वा (जुलै-ऑगस्ट) धंद्यात मंदी जाणवेल. खर्च वाढेल. शारीरिक दगदग होईल. रवी राशीला १२ वा (नोव्हें.- डिसें.) असताना धंद्यात स्पर्धा जाणवेल, खर्च वाढेल, प्रतिष्ठा पणाला लागेल.

चंद्रबल (तारखा)

जानेवारी १५, २१, २२, २३, २४, ३०, ३१
फेब्रुवारी १७, १८, १९, २०, २७, २८, २९
मार्च १, १५, १७, १८, २५, २७, २८
एप्रिल १३, १४, १५, २१, २३, २४, २५, २८, २९
मे १८, १९, २०, २१, २२, २६, २७
जून १५, १६, १८, १९, २२, २३, २६
जुलै १२, १३, १५, १६, १९, २१, २४, २५
ऑगस्ट १२, १४, १६, २२, २३, २४, २५
सप्टेंबर ९, १२, १३, १६, १७, २२, २३
ऑक्टोबर ९,१०, ११, १४, १५,२०,२१
नोव्हेंबर ७, १०, १६, १७, १९, २०
डिसेंबर ७, ८, ९, १४, १५, १६, १७

Back to top button