गुंड शरद मोहोळच्या पत्नीने घेतली फडणवीसांची भेट

गुंड शरद मोहोळच्या पत्नीने घेतली फडणवीसांची भेट

पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा शुक्रवारी दुपारी गोळ्या झाडून खून करण्यात आल्याने कायदा-सुव्यवस्थेवरून विरोधक सरकारवर टीकेची झोड उठवत आहेत. त्या पार्श्वभूमीवर शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. हल्लेखोरांवर तातडीने कारवाई करून न्याय द्यावा, अशी मागणी स्वाती मोहोळ यांनी फडणवीसांकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिली. स्वाती मोहोळ या भाजप पुणे शहर महिला आघाडीच्या सरचिटणीस आहेत. राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी एप्रिल 2023 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news