फडणवीसांना दोन पदांचा कार्यभार पेलवेना : खासदार सुप्रिया सुळे | पुढारी

फडणवीसांना दोन पदांचा कार्यभार पेलवेना : खासदार सुप्रिया सुळे

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री झाल्यापासून राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. त्यांच्या पोलिसांवर हल्ला झाला आहे. त्यांनी सर्वांवर कारवाई करावी. तसेच, त्यांना दोन पदांचा कार्यभार पेलवला जात नाही, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
पुण्यात शरद मोहोळ याचा झालेला खून आणि भाजप आमदार सुनील कांबळेंनी पोलिसांना केलेल्या मारहाणीवरून सुळे यांनी फडणवीस यांच्यावर कडाडून टीका केली. पुण्यात रविवारी (दि.7) सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सुळे म्हणाल्या, अगोदर सकाळी 7 वाजता अजितदादा पुण्यात काम करताना धावपळ करताना दिसायचे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता त्यांची स्टाईल कॉपी करताना दिसत आहेत.

तसेच, मी इतके दिवस मुख्यमंत्र्यांना कधीच एवढ्या सकाळी कुठली पाहणी करताना पाहिले नव्हते. एका नालेसफाईची पाहणी करून आणि सकाळी 8 वाजता सफाईच्या ठिकाणी जाऊन प्रश्न सुटत नाहीत, असा टोलाही सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला. तसेच, दिल्लीत जशी दडपशाही आहे तशीच महाराष्ट्र राज्यात देखील दडपशाही सुरू आहे.

दादा सीनियर सिटीजन नाऊ…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर बोलताना रोहित अजून बच्चा आहे, असे म्हटले. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, दादा वयाने मोठा आहे. तो रोहितचा काका आहे. थोडा काही बोलला तर आपण एवढं कशाला मनाला लावून घ्यायचं? रोहितचं वय 40 तर दादा 65 वर्षांचा आहे. त्यामुळे काकांनी काही बोललं तर इट्स ओके. दादा सीनियर सिटीजन नाऊ, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Back to top button