रेल्वेचे अपूर्ण प्रकल्प मार्गी लावणार : रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे | पुढारी

रेल्वेचे अपूर्ण प्रकल्प मार्गी लावणार : रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे

दौंड : पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात सर्वत्र रेल्वेचे नवनवीन मोठमोठे प्रकल्प सुरू केले. जे प्रकल्प अर्धवट अवस्थेत होते, ते मार्गी लावले आहेत. सन 2014 ते 2023 मध्ये केंद्र सरकारने रेल्वेच्या कामकाजाकरिता जवळपास 1300 कोटी रुपये व 2023 मध्ये पुन्हा 1100 कोटी रुपये असा भरघोस निधी दिला आहे. या निधीमधून रेल्वेचे अपूर्ण प्रकल्प पूर्ण करणार असल्याची ग्वाही केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी रविवारी (दि. 7) रात्री साडेआठच्या सुमारास दौंड रेल्वे स्थानकाला भेट दिली. या वेळी त्यांनी वरील आश्वासन दिले.

याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना राज्यमंत्री दानवे म्हणाले, अमृत भारत योजनेमध्ये देशातील 500 रेल्वे स्थानकाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. रेल्वे विभागात वेगवेगळ्या मार्गांवर नवनवीन गाड्या सुरू करण्यात आल्या. यामध्ये दर आठवड्याला एक वंदे भारत या गाडीचादेखील समावेश आहे. पैसे नाहीत म्हणून कोणतेही प्रकल्प बंद पडू दिले नसल्याची माहिती राज्यमंत्री दानवे यांनी या वेळी दिली. याप्रसंगी आमदार राहुल कुल, भाजप जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष प्रेमसुख कटारिया, कांचन कुल, भाजपचे दौंड शहराध्यक्ष स्वप्निल शहा आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button