सोबत्यानेच केला गोळीबार ! गुंड शरद मोहोळचा उपचारादरम्यान मृत्यू | पुढारी

सोबत्यानेच केला गोळीबार ! गुंड शरद मोहोळचा उपचारादरम्यान मृत्यू

पुढारी ऑनलाईन : पुण्यात आज खळबळ माजली ती भरदिवसा घडलेल्या गोळीबाराने. सुतारदरा परिसरात कुख्यात गुंड शरद मोहोळवर भरदिवसा गोळीबार झाला. या गोळीबारात मोहोळ याचा मृत्यू झाला आहे. दुपारी एक वाजून वीस मिनिटांनी हे थरारनाट्य घडले. मोहोळ याच्यावर त्याच्यासोबत असलेला साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर (रा,सुतारदरा, कोथरूड) ह्याने आणि त्याच्या इतर साथीदारांनी गोळीबार केला. गंभीर जखमी अवस्थेत मोहोळ याला सह्याद्री हॉस्पिटल कोथरूड आणि ससून हॉस्पिटल इथे दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. .गुन्ह्यात  निष्पन्न झालेल्या आरोपींचा शोध सुरु असून पुढील तपास चालू आहे. शरद मोहोळ याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, अपहरण असे अनेक गुन्हे दाखल होते.

संशयित दहशतवाद्याच्या हत्येत सहभाग ! 

2012 मध्ये संशयित दहशतवादी महम्मद कातिल महम्मद जाफर सिद्दीकी ऊर्फ सज्जन ऊर्फ साजन ऊर्फ शहजादा सलीम याचा खून मोहोळने केला होता.

Back to top button