85 वा वर्धापनदिन स्नेहमेळा : दै.‘पुढारी’ला शुभेच्छा देण्यासाठी लोटला जनसागर | पुढारी

85 वा वर्धापनदिन स्नेहमेळा : दै.‘पुढारी’ला शुभेच्छा देण्यासाठी लोटला जनसागर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरातील थोरामोठ्यांची मांदियाळी… शुभेच्छांचा आणि अभिनंदनाचा वर्षाव… गुलाबी थंडीत रंगलेल्या गप्पा अन् हास्यकल्लोळ… अशा भारावलेल्या वातावरणात दैनिक ‘पुढारी’चा 85 वा वर्धापन दिन बुधवारी उत्साहात साजरा झाला. विविध क्षेत्रांमधील मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमाचे आकर्षण ठरली. सर्वसामान्य वाचकांशी जोडल्या गेलेल्या दैनिक ‘पुढारी’च्या ऋणानुबंधांची यानिमित्ताने प्रचिती आली.

मित्रमंडळ चौकातील ‘मॅरेथॉन हॉल गार्डन’च्या मैदानावर आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आली होती. सायंकाळी 6 ते 10 या कालावधीत पुणेकरांनी अलोट गर्दी करून दैनिक ‘पुढारी’वरील प्रेमाची पोचपावती दिली. या वेळी दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव, पुढारी वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष व समूह संपादक डॉ. योगेश जाधव, संचालक मंदार पाटील, राजवीर योगेश जाधव, निवासी संपादक सुनील माळी, सहयोगी संपादक सुहास जगताप यांनी मान्यवरांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. या वेळी राजकीय, सामाजिक, शासकीय, पोलिस, शैक्षणिक, वैद्यकीय, सांस्कृतिक, क्रीडा, व्यापारी, वकील, बांधकाम व्यावसायिक, कृषी, सहकार, वाहतूक, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांमधील मान्यवर उपस्थित होते.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार रवींद्र धंगेकर, चेतन तुपे, सिध्दार्थ शिरोळे, भीमराव तापकीर, तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, शिवसेना (शिंदे गट) शहराध्यक्ष गजानन तरपुडे, आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आवर्जून उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, बेळगाव ‘तरुण भारत’चे संपादक किरण ठाकूर, पोलिस आयुक्त रितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, उच्चशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, पुणे विभागीय सहसंचालक केशव तुपे, एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड,
प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ. विजय खरे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.

ज्येष्ठ उद्योजक विठ्ठलशेठ मणियार, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक रणजित नाईकनवरे, गोयलगंगा ग्रुपचे कृष्णकांत गोयल यांच्याशिवाय प्रशासकीय क्षेत्रातील विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) इंदू दुबे, पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय कोलते, शहर एसआरपीएफचे विशेष पोलिस महानिरीक्षक अशोक मोराळे, कारागृह विशेष महानिरीक्षक जालिंदर सुपेकर, अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, अपर पोलिस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील, वैध मापनशास्त्र विभागाचे सहनियंत्रक सुरेश चाटे.

महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार, अपर जमाबंदी आयुक्त सरिता नरके, महापालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, डॉ. कुणाल खेमनार, विकास ढाकणे, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर, सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार, ससूनचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. सहकार क्षेत्रातील महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सुभाष मोहिते.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा.डॉ. दिगंबर दुर्गाडे, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद आकरे, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, तर सांस्कृतिक क्षेत्रातील ज्येष्ठ लेखक डॉ. न. म. जोशी, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, गायक पं. संजीव अभ्यंकर यांनी कार्यक्रमाला येऊन दैनिक ‘पुढारी’ला शुभेच्छा दिल्या.

दै. ‘पुढारी’च्या तीन पिढ्यांना शुभेच्छा!

वर्धापन दिनानिमित्त आयोजित स्नेहमेळाव्यात व्यासपीठावर उपस्थित दैनिक ‘पुढारी’च्या तीन पिढ्यांना शुभेच्छा देण्यासाठी पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, दै. ‘पुढारी’चे चेअरमन डॉ. योगेश जाधव आणि त्यांचे चिरंजीव तसेच चौथ्या पिढीचे प्रतिनिधी राजवीर जाधव यांनी उपस्थित पुणेकरांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला आणि त्याबद्दल त्यांचे आभारही मानले. दै. ‘पुढारी’चे संचालक मंदार पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या नागरिकांनी दै. ‘पुढारी’च्या तीन पिढ्यांशी संवाद साधताना आपल्या स्वत:च्या तसेच समाजाच्या प्रश्नांसाठी दै. ‘पुढारी’ने दिलेल्या योगदानाची आवर्जून आठवण करून दिली. ‘पुढारी’ समूहाने सुरू केलेल्या ‘पुढारी न्यूज’ या टीव्ही चॅनेलबद्दलही उपस्थितांनी गौरवोद्गार काढले.

हेही वाचा

Back to top button