

पुणे : अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीय स्थितीमुळे राज्यातील काही भागांत बुधवारपासून हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, सोमवारी राज्यात गोंदियामध्ये 12.4 अंश सेल्सिअस इतके सर्वांत नीचांकी तापमान नोंदवले आहे. हिंदी महासागर आणि अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीय स्थितीमुळे राज्यात ढगाळ वातावरण तयार झाले आहे.
त्यामुळे किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे.सोमवारपासून राज्यातील बहुतांश भागात सायंकाळच्या सुमारास गारवा कमी झाला होता. बहुतांश भागांत ढग दाटून आले. त्यामुळे बुधवार ते शुक्रवार या तीन दिवसांत कोकण व मध्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
हेही वाचा