एकवीरा देवस्थान ट्रस्टचा कारभार नवनिर्वाचित विश्वस्तांकडे सुपूर्त | पुढारी

एकवीरा देवस्थान ट्रस्टचा कारभार नवनिर्वाचित विश्वस्तांकडे सुपूर्त

कार्ला : पुढारी वृत्तसेवा : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार श्री एकवीरा देवस्थान ट्रस्टचा ताबा हा त्रिसदस्सीय प्रशासकीय समितीकडे सोपविण्यात आला होता. आजअखेर मुंबई हायकोर्टचे अधिकारी सुहास परांजपे यांच्या समवेत हा ताबा नवनिर्वाचित विश्वस्तांकडे सुपूर्त करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाच्या 4 सप्टेंबर 2018 रोजीच्या निकालानुसार श्री एकवीरा देवस्थान ट्रस्टचा कारभार त्रिसदस्यीय प्रशासकीय समितीकडे होता. त्यामुळे नवनिर्वाचित विश्वस्त नवनाथ रामचंद्र देशमुख यांनी सर्व विश्वस्तांच्या सहकार्याने मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. त्यानुसार उच्च न्यायालयाने 19 डिसेंबर रोजी त्रिसदस्यीय प्रशासकीय समितीकडे असलेला ताबा नवनिर्वाचित विश्वस्तांकडे सुपूर्त करण्यात यावा, असा निकाल देण्यात आला.

त्या आदेशानुसार शुक्रवारी सकाळी 11 वाजता वडगाव येथे त्रिसदस्यीय प्रशासकीय समितीच्या अध्यक्षा सी. आर. उमरेडकर, सचिव तहसीलदार विक्रम देशमुख, सहायक धर्मादाय आयुक्त आर. परदेशी व नवनिर्वाचित विश्वस्त मंडळाचे मारुती रामचंद्र देशमुख, संजय बाळकृष्ण गोविलकर, नवनाथ रामचंद्र देशमुख, सागर मोहन देवकर, विकास काशिनाथ पडवळ, महेंद्र अशोक देशमुख आणि मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकारी सुहास परांजपे अशी संयुक्त मीटिंग घेण्यात आली. या मीटिंगमध्ये श्री एकवीरा देवस्थान ट्रस्टचा ताबा नवनिर्वाचित विश्वस्तांकडे सुपूर्त करण्यात आला.

हेही वाचा 

Back to top button