Pune : जयस्तंभ परिसराची अतिरिक्त पोलिस महासंचालकाकडून पाहणी

Pune : जयस्तंभ परिसराची अतिरिक्त पोलिस महासंचालकाकडून पाहणी

कोरेगाव भीमा : पुढारी वृत्तसेवा :  कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे 1 जानेवारीच्या जयस्तंभ अभिवादन सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक संजय सक्सेना यांच्याकडून परिसराची पाहणी करण्यात आली. 1 जानेवारीच्या जयस्तंभ अभिवादन सोहळ्याची सर्व विभागांकडून जोरदार तयारी सुरू आहे. या सोहळ्यामध्ये सर्वांत महत्त्वाची जबाबदारी पोलिस प्रशासन सांभाळत असते. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांची तसेच कोरेगाव भीमा, वढू बुद्रुक, शिक्रापूर, रांजणगाव परिसराची राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक संजय सक्सेना यांनी पाहणी केली. एकूण परिस्थितीचा आढावा घेत आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकार्‍यांना दिल्या.

पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक अंकित गोयल, शिक्रापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, रांजणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश ढवाण, शिरूरचे पोलिस निरीक्षक संजय जगताप, विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक प्रवीण मोरे, सहायक पोलिस निरीक्षक केशव वाबळे, पोलिस उपनिरीक्षक अविनाश थोरात, पोलिस हवालदार सचिन मोरे, संदीप कारंडे व पोलिस पाटील मालन गव्हाणे आदी या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news