कोंढवा : पुढारी वृत्तसेवा : दाट लोकवस्तीच्या ठिकाणी कायद्यानुसार दफनभूमी करता येत नाही. दफनभूमी करण्यास आमचा कोणताही विरोध नाही. मात्र, ती लोकवस्तीच्या बाहेर असावी, हे सर्वज्ञात आहे. दफनभूमीसाठी ज्या अधिकार्यांनी मंजुरी दिली, त्यांच्यावर प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी. येत्या आठ दिवसांत फुटबॉल मैदानावर होऊ पाहणार्या दफनभूमीचा निर्णय मागे घेण्यात यावा; अन्यथा आम्ही संविधानिक मार्गाने शिवसेना स्टाईलने पुणे महापालिका येथे आंदोलन करू, असा इशारा शिवसेना (शिंदे गट) शहराध्यक्ष प्रमोदनाना भानगिरे यांनी दिला असून, महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे.
कोंढव्यातील दहा ते पंधरा हजार हिंदू लोकवस्ती असलेल्या सर्व्हे नंबर 44 या भागात लहान मुलांच्या खेळासाठी असलेल्या फुटबॉलच्या मैदानासाठी महानगरपालिकेने 45 लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. मात्र, स्थानिक लोकप्रतिनिधींनी महापालिकेकडे संबंधित ठिकाणी मुस्लिम समाजाची दफनभूमी व्हावी, यासाठी पाठपुरावा केला होता. याच पार्श्वभूमीवर सद्य:स्थितीला या मैदानावर दफनभूमी होत आहे. मात्र, हा परिसर दाट लोकवस्तीचा असल्यामुळे कायद्यानुसार भर लोकवस्तीत दफनभूमी करता येत नाही. दफनभूमी करण्यास आमचा कोणताही विरोध नाही. मात्र, ती लोकवस्तीच्या बाहेर असावी, हे सर्वज्ञात असताना देखील या दफनभूमीस पालिका अधिकार्यांनी मंजुरी दिली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन महापालिका आयुक्तांना दिले आहे.
हेही वाचा