Pune Crime News : घरखर्चाला पैसे न दिल्याने पत्नीने पतीलाच संपवलं

file photo
file photo

पिंपरी : घरखर्चाला पैसे न दिल्याच्या कारणावरून पत्नीने पतीचा खून केला. ही घटना 18 डिसेंबर रोजी मध्यरात्री सव्वाच्या सुमारास भारतमातानगर, दिघी येथे घडली. रवींद्र बाबूलाल नागरे (39, रा. भारतमातानगर, दिघी; मूळ रा. चाळीसगाव, जि. जळगाव) असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी रवींद्र यांच्या बहिणीने दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रवींद्र यांच्या पत्नीला अटक केली आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक मच्छिंद्र पंडित यांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र नागरे हे पेट्रोल पंपावर कामाला होते. आरोपी पत्नीला घेऊन ते भारतमातानगर येथे भाड्याच्या खोलीत राहत होते. दरम्यान, 17 डिसेंबर रोजी रवींद्र यांनी पत्नीला घरखर्चासाठी पैसे न दिल्याने त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर रवींद्र कामावर निघून गेले. रात्री घरी आल्यानंतर त्यांच्यात पुन्हा वाद होऊन भांडण झाले. त्या वेळी आरोपी पत्नीने रवींद्र यांना हाताने मारहाण केली तसेच चेहर्‍यावर नखाने ओरखडून त्यांना सोफ्यावर ढकलून दिले. यामध्ये रवींद्र यांचे नाक आणि गळ्याला दुखापत झाली. त्यानंतर आरोपी पत्नीने शर्ट रवींद्र यांच्या नाकावर दाबून धरून त्यांचा खून केला. दिघी पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news