धक्कादायक! कर्णबधिर मुलीवर भावासह इतर दोघांचा बलात्कार | पुढारी

धक्कादायक! कर्णबधिर मुलीवर भावासह इतर दोघांचा बलात्कार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : एका 17 वर्षीय कर्णबधीर मुलीवर तिचा भाऊ व अन्य दोघांनी लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार मुंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला. पीडितेच्या शिक्षिकेने मुलीशी साधलेल्या संवादानंतर हा घृणास्पद प्रकार समोर आला. दोन मित्रांसह मुलीच्या भावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कर्णबधिर शाळेच्या एका 51 वर्षीय महिला शिक्षिकेने आरोपीविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

हा प्रकार सन 2018 ते आतापर्यंत घडलेला आहे. एका मित्राने लग्नाचे आमिष दाखवून मुलीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.
तसेच राहत्या घरी मुलीच्या 14 वर्षीय भावाने घरात एकटीच असल्याचा गैरफायदा घेत तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तक्रारदार 17 वर्षीय मुलगी ही कर्णबधिर असून, तिची एका आरोपीसोबत ओळख झाली होती. संबंधित आरोपीने मुलीच्या घरी येऊन जबरदस्तीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवून तिला मारहाण केली. तसेच याबाबतची कुठे वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. मुलीच्या ओळखीच्या मित्राने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा

Back to top button