राजगुरुनगर : पुढारी वृत्तसेवा : राजगुरुनगर शहरात रस्त्याच्या कामासाठी विजेच्या खांबांची जागा व वीजवाहक तारा बदलताना ठेकेदाराच्या दोन कर्मचार्यांना विजेचा धक्का बसला. यात एकाचा मृत्यू झाला असून, दुसरा कामगार गंभीर जखमी झाला आहे. खेड प्रांताधिकारी कार्यालयासमोर वाडा रस्त्यावर मंगळवारी (दि. 19) हा अपघात घडला. सचिन रवींद्र वटी (वय 20, मूळ रा. देवरी, जि. गोंदिया) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे, तर स्वप्निल राधेश्याम मानकर (वय 20, रा. देवरी, जि. गोंदिया) असे जखमी कामगाराचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेप्रकरणी अधिकार्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केल्याचे समोर आले आहे.