तळवडे इंडस्ट्रियल बेल्टला समस्यांचे ग्रहण; नागरिक त्रस्त

तळवडे इंडस्ट्रियल बेल्टला समस्यांचे ग्रहण; नागरिक त्रस्त
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : तळवडे आयटी पार्क तसेच तळवडे येथून चाकण औद्योगिक वसाहतीसाठी होणारी वाहतूक यामुळे तळवडे परिसरातील प्रमुख चौकांमध्ये दररोज वाहतूक कोंडीच्या समस्येला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. त्याचप्रमाणे, येथील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. सातत्याने होणार्‍या खंडित वीजपुरवठ्याच्या समस्येनेदेखील उद्योजक हैराण आहेत. एकूणच तळवडे इंडस्ट्रियल बेल्टला समस्यांचे ग्रहण लागले असल्याचे चित्र सध्या पाहण्यास मिळत आहे.

कोठे होते वाहतूक कोंडी ?

त्रिवेणीनगर चौक, टॉवरलाईन चौक, गणेशनगर चौक, जोतिबानगर चौक आणि तळवडे मुख्य चौक, कॅनबे चौक आदी ठिकाणी प्रामुख्याने वाहतूक कोंडीची समस्या जाणवत आहे. सकाळी 8ः30 ते दुपारी 12 आणि दुपारी 2 ते रात्री 8 दरम्यान वाहतूक कोंडीचा विळखा पाहण्यास मिळत आहे. संबंधित चौकामध्ये वाहतूक पोलिस असल्यास काही प्रमाणात वाहतूक कोंडीचा तिढा सुटतो. तळवडे चौकात आणि त्रिवेणीनगर चौकाजवळ असे दोन अपघात झाले.

रस्त्यांची झाली दुरवस्था

तळवडे येथील रस्त्यांच्या मध्ये मोठे-मोठे चेंबर आहेत. प्रत्येक चेंबरच्याजवळ रस्ते खराब झालेले आहे. गणेशनगर चौक येथे रस्तारुंदीकरण झालेले नाही. त्यामुळे येथून मोठे ट्रक, कंटेनर यांना ये-जा करण्यात अडथळा जाणवतो. त्रिवेणीनगर चौकातही स्पाईन रस्त्याचे काम अर्धवट आहे. येथील जागा ताब्यात आल्यानंतर महापालिकेला रस्ता विकसित करता येणार आहे. पुढील महिनाभरात जागेचा ताबा घेऊन रस्त्याचे काम सुरू करण्याचे नियोजन आहे.

खंडित वीजपुरवठ्याने उद्योजक त्रस्त

तळवडे औद्योगिक पट्ट्यात वारंवार खंडित होणार्‍या वीजपुरवठ्याने उद्योजक त्रस्त झाले आहेत. येथील गट नंबर 70 मध्ये सध्या ट्रॉन्सफॉर्मर बसविलेला आहे. आणखी चार ठिकाणी ट्रॉन्सफॉर्मर बसविण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे, फीडरची लांबी कमी करायला हवी, अशी मागणी उद्योजकांनी केली आहे.

  •  हिंजवडीपाठोपाठ तळवडे येथे आयटी पार्क विकसित झालेला आहे. त्याचप्रमाणे, चिंचवड, आकुर्डी, प्राधिकरण, रावेत या भागातील नागरिक तसेच वाकड येथील नागरिकदेखील या रस्त्याने तळवडे आयटी पार्क आणि चाकणसाठी पुढे जातात. त्याशिवाय, भोसरी येथून येणारी वाहने त्रिवेणीनगर चौकात येतात. त्यामुळे येथील रस्त्यावर दररोज वाहतूक कोंडीची समस्या जाणवते.

तळवडेत दररोज वाहतूक कोंडीची समस्या जाणवत आहे. याबाबत पोलिस आयुक्त, वाहतूक विभागाकडे यापूर्वी तक्रार केली आहे. पालिकेने पर्यायी रस्ते काढायला हवेत. वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी चाकणला जाण्यासाठी पर्यायी रस्ते हवेत. तळवडे आयटी पार्क येथे रस्ते अरुंद असल्याने वाहतूक कोंडी होते. एमआयडीसी, पालिका आणि पीएमआरडीए अधिकार्‍यांनी यांनी एकत्रित बैठक घेऊन याबाबत तोडगा काढायला हवा.

– संदीप बेलसरे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटना.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news