Illegal Hordings: बोरीभडक-स्वामी चिंचोलीदरम्यान 70 धोकादायक होर्डिंग्ज

महामार्गावरील होर्डिंग्जच्या स्ट्रक्चरल ऑडिटची गरज
Illegal Hordings
बोरीभडक-स्वामी चिंचोलीदरम्यान 70 धोकादायक होर्डिंग्जPudhari
Published on
Updated on

खोर: पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बोरीभडक ते स्वामी चिंचोली या सुमारे 67 किलोमीटर अंतरामध्ये दोन्ही बाजूंनी लहान-मोठ्या एकूण जवळपास 250 होर्डिंग्ज आहेत. यापैकी 70 होर्डिंग्ज हे धोकादायक अवस्थेत असून, त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची वेळ आली आहे.

एक वर्षापूर्वी मुंबईत अवैध होर्डिंग कोसळून अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता. त्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्यातील 59 अनधिकृत व धोकादायक होर्डिंग्जवर प्रशासनाने कारवाई करत संबंधित मालकांना गटविकास अधिकार्‍यांच्या मार्फत नोटिसा बजावल्या होत्या. मात्र, अद्याप अनेक ठिकाणी असे होर्डिंग्ज उभे असून त्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. (Latest Pune News)

Illegal Hordings
Local Bodies Election: गावगाड्यातील राजकीय वातावरण तापू लागले; उमेदवारी नक्की कुणाला मिळणार याकडे लक्ष

सध्या दौंड तालुक्यातील बोरीभडक, बोरीऐंदी, डाळिंब, कासुर्डी, यवत, भांडगाव, चौफुला, वरवंड, पाटस, कुरकुंभ, रावणगाव, मळद, खडकी आणि स्वामी चिंचोली या गावांतील प्रमुख चौकांमध्ये मोठ्या प्रमाणावर होर्डिंग्ज उभारण्यात आले आहेत. हे होर्डिंग्ज भाडेतत्त्वावर देण्यात येतात. विजयाच्या शुभेच्छा, वाढदिवस, सण-उत्सव, पालखी सोहळा, तसेच व्यवसाय व दवाखान्यांच्या जाहिरातींसाठी त्याचा वापर होतो. जाहिरात एजन्सींना व्यावसायिकांकडून ठरावीक टक्केवारीत पैसे मिळतात व त्या बदल्यात या जाहिराती 1 महिना ते वर्षभर झळकत असतात.

लोखंडी सांगाडेही धोकादायक स्थितीत

अनेकदा जाहिरात नसतानाही लोखंडी सांगाडा धोकादायक स्थितीत तसाच उभा राहतो. त्यामुळे वादळी वार्‍यांमध्ये कोसळण्याची शक्यता असते. पावसाळ्याच्या तोंडावर या सांगाड्यांची व पाया मजबूत आहे की नाही याची कोणतीही तपासणी केली जात नाही. महामार्गालगत पथारी व्यावसायिकांनी देखील मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले असून त्यामुळे अपघातांची शक्यता अधिक वाढली आहे.

Illegal Hordings
Onion Price: आळेफाटा उपबाजारात कांदा भावात घसरण

प्रशासनाने तातडीने लक्ष देणे गरजेचे

दौंड तालुक्यातील अवैध होर्डिंग्जकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. केवळ नोटिसा देणे पुरेसे नाही तर प्रत्येक होर्डिंग्जचा बांधकाम दर्जा, परवाना स्थिती आणि सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने तपासणी करणे ही काळाची गरज बनली आहे.

पुणे-सोलापूर महामार्गावरील होर्डिंग्जचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक होर्डिंग्ज अनधिकृत, विनापरवाना, धोकादायकरीत्या सार्वजनिक ठिकाणी उभारण्यात आले आहेत. वर्दळीच्या ठिकाणी असणारी धोकादायक होर्डिंग्ज त्वरित हटवली पाहिजेत; अन्यथा मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. मुंबईतील आणि पुणे रेल्वे स्थानकाजवळ घडलेल्या दुर्घटनांत अनेक बळी गेले. आमच्या परिसरात अजून अशी घटना घडलेली नसली तरी ती टाळण्यासाठी सर्व होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे अत्यावश्यक आहे.

- श्याम कापरे, भांडगाव.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news