हुडहुडीचे राज्य : सायंकाळी पाचपासूनच शहरात गारठा

हुडहुडीचे राज्य : सायंकाळी पाचपासूनच शहरात गारठा

पुणे : लागोपाठ दुसर्‍या दिवशी शहराच्या किमान तापमानात 1 ते 2 अंशांनी घट झाल्याने शहरात चांंगलाच गारठा जाणवू लागला आहे. शहरात सर्वात कमी तापमान एनडीए परिसरात 10.9, तर शिवाजीनगरचा पारा 12 अंशांवर खाली आल्याने शहराला हुडहुडी भरली. गुरुवारपर्यंत शहराचा पारा 15 अंशांवर स्थिर होता. मात्र, शुक्रवारी शहराच्या किमान तापमानात 3 अंशांनी घट होऊन पारा 12.3 अंशांवर घसरला, तर शनिवारी 12 अंशांवर खाली आला. एनडीए परिसराचा पारा चक्क 10.9 अंशांवर आल्याने त्या परिसरात दिवसभर गारठा जाणवत आहे.

हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद
यंदाच्या हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद शनिवारी झाली. शहरात डिसेंबरमध्ये सरासरी किमान तापमान 8 ते 11 अंशांवर जाते. मात्र, यंदा 14 डिसेंबरपर्यंत शहराचे किमान तापमान 15 अंशांच्या खाली गेले नव्हते.

आगामी पाच दिवस लाट तीव्र..

पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार शहरातील किमान तापमानात एक ते तीन अंशांनी घट होईल. 18 ते 22 डिसेंबरदरम्यान शहराचा पारा 10 अंशांच्या खाली जाईल, असा अंदाज वर्तवला आहे.

शनिवारचे शहराचे तापमान..

एनडीए 10.9, शिवाजीनगर 12, पाषाण 12.8, लोहगाव 14, चिंचवड 16.6, लवळे 17.1, मगरपट्टा 16.8, कोरेगाव पार्क.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news