आयटीतील पाण्याची अधिवेशनात खळखळ

आयटीतील पाण्याची अधिवेशनात खळखळ
Published on
Updated on

हिंजवडी : आयटी परिसरातील नागरी समस्या कायमच लक्षवेधी ठरतात. मात्र आयटी परिसरातील पाणीप्रश्नदेखील मागील काही काळात ऐरणीवर आला आहे. याचाच परिणाम हिवाळी अधिवेशनात हिंजवडीसह परिसरात असलेल्या पाणी समस्येबाबत लक्षवेधी मांडण्यात आली.

मारुंजी गावचा पाणीप्रश्न गंभीर

  •  मुळशी प्रादेशिक जलवाहिनी टप्पा क्रमांक दोनमध्ये असलेल्या मारुंजी गावचा पाणीप्रश्नदेखील गंभीर झाला आहे. यासाठी ग्रामस्थांच्या मागणीस्तव या प्रकल्पातून मारुंजी गाव वगळून या गावासाठी जलजीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून स्वतंत्र पाणी योजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत ग्रामपंचायत स्तरातून पत्रव्यवहार करण्यात आला होता. या मागण्यांना काही प्रमाणात यश मिळत आहे.
  • अनेकदा या गावात कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. तर, काही ठिकाणी पाणीच मिळत नाही. त्यामुळे या परिसरातील पाण्याची समस्या कधी मार्गी लागणार, हा प्रश्न काही प्रमाणात मिटेल का? या प्रश्नाचे उत्तर काही कालावधीनंतर मिळेल.वाढीव पाण्याची मागणी
  •  यात स्थानिक आमदार संग्राम थोपटे यांनी पुढाकार घेतला होता. हिंजवडी ग्रामस्थांची अधिकची पाणी मागणी आहे. गावास सुमारे 30 लाख लीटर दररोज पाण्याची मागणी करण्यात आली होती. माण ग्रामपंचायतसाठीदेखील 35 लाख लीटर पाणी मागणी करण्यात आली आहे. हिंजवडी ग्रामपंचायतीला सध्या 15 लाख लीटर पाणी उपलब्ध होत आहे.
  •  तर, माण ग्रामपंचायतसाठी केवळ अडीच लाख लिटर पाणी वापरास मिळत आहे. वाढती लोकसंख्या पाहता दोन्ही महत्त्वाच्या गावांना मुबलक पाणी आवश्यक आहे. त्यामुळे याबाबत वेळोवेळी मागणी करण्यात येत आहे. यासाठी एमआयडीसीकडे वेळोवेळी मागणी करण्यात येत आहे. परंतु, ग्रामपंचायतच्या पाण्यासाठी थेट विधानसभेत आता आवाज उठवला गेला असल्याने हा प्रश्न अधिक गंभीर असल्याचे अधोरेखित झाले आहे.

माण ग्रामपंचायतीस पाणी मिळत आहे. मात्र, मागील काही वर्षांत पाण्याची वाढती मागणी पाहता नव्याने पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. त्यासाठी वेळोवेळी पत्रव्यवहार करून एमआयडीसीकडे याबाबत मागणी करण्यात आली आहे. शासनाने याबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी.

– अर्चना आढाव, सरपंच, माण ग्रामपंचायत

मारुंजी गावची पाण्याची गरज लक्षात घेता सक्षम आणि मोठ्या स्वरूपात पाणी योजना आवश्यक आहे. मुळशी प्रादेशिक पाणी योजना टप्पा क्रमांक 2 ही न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्याने गावाच्या पाणी प्रश्नाबाबत ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे. यासाठी स्वतंत्र पाणी योजना आवश्यक आहे.

– शिवाजी बुचडे पाटील, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news