सतारवादक पं. नीलाद्री कुमार यांच्या लोकप्रियतेची साक्ष देत होती. स्वरमंचावरील त्यांच्या आगमनाची रसिकांना उत्सुकता होती. त्यांच्या सतार वादनाने रसिकांची दाद मिळवली. ज्येष्ठ सतारवादक पं. रविशंकर रचित 'यमन मांझ' रागाने नीलाद्री यांनी वादनाला आरंभ केला. विलंबित लयीवर कमालीचे प्रभुत्व दर्शवणार्या त्यांच्या वादनाने सुरुवातीपासूनच रसिकांच्या मनाची पकड घेतली. राग पंडित रविशंकर यांचा, पण राग विचार आणि रागमांडणी नीलाद्री यांची स्वतःची असल्याने त्यांच्या वादनाने स्वरमंडपात चैतन्य निर्माण केले. प्रत्येक आवर्तनाला रसिक टाळ्यांचा कडकडाट करत दाद देत होते. वादनाच्या अखेरीस त्यांनी रसिकांच्या आग्रहाला मान देत धून पेश केली. त्यांच्या वादनाला सत्यजित तळवलकर यांनी अतिशय पूरक अशी तबलासाथ करून मैफलीची रंगत वाढवली.
'सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव हा माझ्यासाठी केवळ मंच नाही तर मंदिर आहे. ज्याप्रमाणे आपण देवाचे दर्शन घ्यायला, आशीर्वाद घ्यायला मंदिरात जातो तसा मी येथे येतो. मी जगभरात, भारतभर सादरीकरण करतो. मात्र, सवाईसारखा महोत्सव आणि पुण्यासारखे रसिक श्रोते कोठेच नाहीत. आज माझे वडीलदेखील येथे मला ऐकायला आले हे माझ्यासाठी सरप्राईज होते. श्रीनिवास जोशी यांनी ते येत आहेत म्हणून मला 15 मिनिटे वेळ वाढवून दिली ती का दिली हे माझे वडील आल्यावर समजले.– पं. नीलाद्री कुमार, सतारवादक