

तळेगाव ढमढेरे : पुढारी वृत्तसेवा : करंदी येथील कंपनीमध्ये कामावर चाललेल्या सुरक्षारक्षकाला तीन अज्ञात युवकांनी मारहाण करत लुटल्याची घटना बुधवारी (दि. 13) घडली. याप्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात तीन अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला. करंदी (ता. शिरूर) येथे राहणारे रविशंकर खरवार हे इन्फीलूम इंडिया प्रायवेट लिमिटेड कंपनीचे सुरक्षारक्षक आहेत. बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास रस्त्याने पायी कंपनीमध्ये कामावर चाललेले होते. ओरियंटल रबर व फेबर या दोन कंपन्यांमध्ये एका दुचाकीहून तिघे आले. त्यांनी रविशंकर यांना मारहाण करत त्यांच्याजवळील मोबाईल काढून घेत त्यातून पैसे काढून घेतले. या वेळी रस्त्याने एक कार येत असल्याचे लक्षात आल्याने तिघे जण त्यांच्याजवळील विनाक्रमाकांच्या दुचाकीवरून निघून गेले. शिक्रापूर पोलिस ठाण्यात याबाबत सुरक्षारक्षक रविशंकर श्रीदिनेश खरवार (वय 24, रा. करंदी, ता. शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे. तपास पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक वैभव पवार व पोलिस कर्मचारी नीरज पिसाळ हे करीत आहेत.
हेही वाचा :