जुन्या पेन्शनसाठी आजपासून शिक्षक संपावर

जुन्या पेन्शनसाठी आजपासून शिक्षक संपावर
Published on
Updated on

बारामती : पुढारी वृत्तसेवा :  शासकीय सेवेत 1 नोव्हेंबर 2005 पासून रुजू झालेले शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सरकारी, निमसरकारी अधिकारी- कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी राज्यातील 23 प्राथमिक शिक्षक संघटना गुरुवार (दि. 14) पासून बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेचे राज्याध्यक्ष केशवराव जाधव यांनी दिली.
जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी मार्चमध्ये राज्यातील शिक्षक संघटनांसह सर्वच कर्मचारी संघटनांनी सात दिवसांचा संप केला होता. संघटनांच्या एकजुटीमुळे व दबावामुळे राज्य शासनाने जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात अभ्यास करण्यासाठी त्रिसदस्यीय अभ्यास समिती तयार केली.

संबंधित बातम्या :

या समितीच्या सदस्यांसमवेत कर्मचारी व शिक्षक संघटना प्रतिनिधींची अनेक वेळा बैठका झाल्या. यात आपली अभ्यासपूर्ण मते नोंदवली. परंतु, अद्याप अंतिम अहवाल तयार करण्यात आलेला नाही. जुन्या पेन्शन योजनेसंदर्भातील अंतिम अहवाल प्रसिद्ध करण्यात राज्य शासन जाणीवपूर्वक चालढकल करत आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात आजअखेर राज्य शासनाने कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही. त्यामुळे कर्मचारी वर्गात अस्वस्थता आहे. या अस्वस्थतेला वाचा फोडण्यासाठी व शासनाला जुन्या पेन्शन योजनेची आठवण करून देण्यासाठी 14 डिसेंबरपासून राज्यातील सुमारे 17 लाख शिक्षक व शासकीय कर्मचारी पुन्हा एकदा बेमुदत संपावर जाणार असल्याचे संघाचे जिल्हा सरचिटणीस सुरेंद्र गायकवाड यांनी सांगितले.

जुनी पेन्शन योजना हा सर्वच कर्मचार्‍यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. ती लवकरात लवकर लागू व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेने पुकारलेल्या बेमुदत संपात पुणे जिल्ह्यातील सर्व शिक्षक बंधू -भगिनींनी सहभागी व्हावे.
                                  – नारायण कांबळे, अध्यक्ष, पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news