Pune Crime News : गुंड निखिल कुसाळकर टोळीवर मोक्का | पुढारी

Pune Crime News : गुंड निखिल कुसाळकर टोळीवर मोक्का

पुणे : पुढारी वृत्तसेवा : तरुणाचे अपहरण करून त्याला मारहाण करणारा गुंड निखिल कुसाळकरसह साथीदारांविरुद्ध पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले. रितेश कुमार यांनी पोलिस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर वर्षभरात शहरातील 96 गुंड टोळ्यांविरुद्ध मोक्का कारवाई केली आहे. याप्रकरणी टोळीप्रमुख निखिल विजय कुसाळकर (वय 22, रा. दीपबंगला चौक, शिवाजीनगर), सुबोध अजित सरोदे (वय 20, रा. पांडवनगर), ओंकार सोमनाथ हिंगाडे (वय 22 रा. पांडवनगर), अभिजित उर्फ प्रफुल्ल बबन चव्हाण (वय 21 रा. चापेकर नगर, गणेशखिंड रस्ता), अयाज रईस उर्फ रईसुद्दीन इनामदार (वय 19, रा. जनवाडी), कल्पेश उर्फ पाकुळी रमेश कराळे (रा. गोखलेनगर) यांच्याविरुद्ध मोक्का कारवाई करण्यात आली आहे. आरोपी हिंगाडेला अटक केली आहे.

कुसाळकर आणि साथीदारांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. कुसाळकर आणि साथीदारांनी तरुणाचे अपहरण करून त्याला मारहाण केली होती. कुसाळकर टोळीविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव चतु:शृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलिस निरीक्षक अंकुश चिंतामण, जगन्नाथ जानकर यांनी तयार केला होता. परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्यामार्फत अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्याकडे प्रस्ताव पडताळणीसाठी पाठविण्यात आला. पोलिस आयुक्तांनी कुसाळकर टोळीविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचे आदेश दिले.

हेही वाचा

Back to top button