घोडेगाव येथे आढळला दुर्मीळ पांढरा बेडूक

घोडेगाव येथे आढळला दुर्मीळ पांढरा बेडूक

मंचर : पुढारी वृत्तसेवा :  घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील हरिश्चंद्र महादेव मंदिराजवळ दुर्मीळ पांढरा बेडूक आढळून आल्याने नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. निसर्गप्रेमी उमाकांत भास्कर व प्रशांत मंडलिक यांना हा पांढर्‍या रंगाचा दुर्मीळ बेडूक दिसून आला. या बेडकाला 'झाड बेडूक' असेही म्हणतात. प्राणिशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. राजकुमार पवार म्हणाले, दुर्मीळ पांढरा बेडूक झाडावर किंवा भिंतीवर चढतो. जास्त पाऊस झाला की हा बेडूक बाहेर पडतो. तो नैसर्गिकरीत्या पांढरा असतो. क्वचितच आढळून येणारा इंडियन कॉमन ट्री प्रजातीच्या दुर्मीळ बेडकाची प्रथम 1830मध्ये जॉन अँडवर्ड ग्रे यांनी जगाला ओळख करून दिली. दक्षिण आशियामध्ये हा बेडूक मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तसेच कोकणासह अतिवृष्टीच्या ठिकाणी जास्त दिसतो.

या बेडकाला 'चुनाम' या नावानेही ओळखले जाते, तर संस्कृतमध्ये याला 'चुर्ण' असे म्हटले जाते. जंगलात किंवा एखाद्या गावात झाड आणि ओलावा असेल तर हे बेडूक येतात. पायाच्या बोटांमध्ये पडदे असलेल्या आपल्या शारीरिक रचनेचा वापर करून तो एक झाडावरून उडत दुसर्‍या झाडावर जातो. झाडावरील बेडकांच्या पायांच्या बोटांचा आकार टोकाकडे पसरट थाळीसारखा झालेला असतो. बेडकांच्या पायावर आतील बाजूस गडद रंगाचे पट्टे असतात. ते बेडकाने उडी मारल्यावर एकदम चमकतात.

शेतकर्‍यांसाठी उपयुक्त असलेला बेडूक
हा बेडूक भडक रंगाचा वापर करून आपल्या शत्रूला चकवतात आणि स्वतःचा बचाव करतात. त्यामुळे असे बेडूक आढळून येणे हा त्या परिसरातील पर्यावरणीय गुणवत्ता चांगले असल्याचे द्योतक आहे. कीटक, किडे हे याचे खाद्य असून, हा बेडूक शेतकर्‍यांसाठी उपयुक्त आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news