Pune : वालचंदनगरच्या संपावर अद्याप तोडगा नाही

Pune : वालचंदनगरच्या संपावर अद्याप तोडगा नाही

वालचंदनगर : पुढारी वृत्तसेवा :  इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर कंपनीतील कामगारांच्या संपाला बारामती तालुका कामगार कृती समितीने पाठिंबा दिला आहे. दरम्यान, या प्रश्नी गुरुवारी औद्योगिक न्यायालयात सुनावणी झाली असून, पुढील सुनावणी 13 डिसेंबरला होणार आहे. संपाला 17 दिवस झाले तरी कोणताही तोडगा निघालेला नाही. कामगारांनीही संपावर ठाम राहण्याचा निर्धार केला आहे.
वालचंदनगर कंपनीतील कामगारांचा 16 महिन्यांपासून वेतनवाढीचा करार रखडला आहे. याशिवाय अनेक देणी थकित आहेत. दरम्यान कंपनी व्यवस्थापन कामगारांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याने कामगारांनी 22 नोव्हेंबरपासून संप सुरू केला आहे. या संपाला जवळपास 17 दिवस झाले आहेत.

संबंधित बातम्या :

या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. 8) बारामती तालुका कामगार कृती समितीने वालचंदनगरच्या कामगारांच्या संपाला पाठिंबा दिला. या वेळी समितीने अध्यक्ष नानासाहेब थोरात, कार्याध्यक्ष तानाजी खराडे, उपाध्यक्ष भारत जाधव, सरचिटणीस कल्याण कदम, सदस्य राजेश चिंचोडकर आदी उपस्थित होते.

13 डिसेंबरला सुनावणी
संपाबाबत औद्योगिक न्यायालयामध्ये गुरुवारी सुनावणी झाली. 13 डिसेंबरला पुढील सुनावणी होणार आहे. सर्व कामगार संपावर ठाम असून कंपनीने तातडीने वेतनवाढीचा करार करून इतर मागण्या मान्य कराव्यात, असे आयएमडी कामगार समन्वय संघाचे अध्यक्ष कपिल गायकवाड व सरचिटणीस शहाजी दबडे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news