Pune News : तुकाराम सुपे यांच्याकडे आणखी चार कोटींची बेहिशेबी मालमत्ता

Pune News : तुकाराम सुपे यांच्याकडे आणखी चार कोटींची बेहिशेबी मालमत्ता

Published on

पुणे : राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त आणि शिक्षणाधिकारी तुकाराम सुपे यांच्याविरुद्ध बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) नुकताच गुन्हा दाखल केला. सुपे यांच्या मालमत्तेची एसीबीकडून पु्न्हा चौकशी करण्यात आली असता त्यांच्याकडे नव्याने तीन कोटी 95 लाख 35 हजार 795 रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळून आली.

शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्यांच्याकडे तीन कोटी 59 लाख 99 हजार 590 रुपयांची मालमत्ता सापडली होती. आता नव्याने मालमत्ता आढळून आली आहे. बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी सुपे यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला.

अनेक ठिकाणी इमारती, सदनिका

पिंपळे गुरव परिसरातील गांगार्डेनगर येथे त्यांचा कल्पतरू बंगला असल्याचे चौकशीत उघडकीस आले असून आळंदी रस्त्यावरील वडमुखवाडी येथे त्यांची साई दर्शन इमारत आहे. पिंपळे गुरव येथील काटेपुरम चौकात श्री दत्त कृपा तीन मजली इमारत आहे. स्वतः सुपे, त्यांची पत्नी कल्पना, मुलगी कोमल, मुलगा तुषार यांच्या नावावर भोसरी येथील नंदनवन कॉलनीत इमारत आहे. नाशिकमधील वडाळा विहार इमारतीत सुपे यांची सदनिका असल्याचे चौकशीत आढळून आले आहे.

पत्नी कल्पना यांच्या नावावर ठाणे जिल्ह्यातील कल्याण परिसरात खडकपाडा येथील अल्पेश अपार्टमेंटमध्ये एक सदनिका आहे. मुरबाड तालुक्यातील पाटगाव येथे सुपे यांनी पत्नीच्या नावाने जमीन खरेदी केली आहे. खेरीज पत्नीच्या नावावर जुन्नर तालुक्यातील माळवाडी, आंबेगाव तालुक्यातील फलोदे येथे जमीन असल्याचे चौकशीत उघडकीस आले आहे. त्यांच्याकडे मोटार, दुचाकी, ट्रॅक्टर अशी वाहने आहेत.

परवानाप्राप्त रिल्व्हॉल्व्हरही

सुपे यांच्याकडे परवानाप्राप्त रिव्हॉल्व्हर आणि काडतुसे आहेत. त्यांच्याकडे आणखी काही बेहिशेबी मालमत्ता असल्यास याबाबतची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (हेल्पलाइन टोल फ्री क्रमांक 1064, 020-26122134, 26138202, व्हॉटसअप क्रमांक 7875333333) द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news