

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : इंदापूर येथे शनिवारी (दि. 9) होणार्या ओबीसी नेते, मंत्री छगन भुजबळ यांच्या भटके विमुक्त ओबीसी आरक्षण बचाव एल्गार मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. विविध शासकीय विभागाच्या अधिकार्यांसह आयोजकांच्या वतीने सभा तयारीचा आढावा घेण्यात आला. इंदापूर शहरातील प्रशासकीय भवनालगतच्या विस्तीर्ण मैदानावर होणार्या या सभेसाठी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, माजी आमदार प्रकाश शेंडगे, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, आमदार गोपीचंद पडळकर, ओबीसी नेते शब्बीर अन्सारी, प्रा. टी. पी. मुंडे, अॅड. बबनराव तायवाडे, प्रा. लक्ष्मण गायकवाड, बारा बलुतेदार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळे यांच्यासह अन्य ओबीसी नेते उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, मैदानावर सभेची जोरदार तयारी सुरू आहे. या सभेसाठी सर्व समाजबांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सकल ओबीसी समाजाच्या वतीने करण्यात आले.
तीनशे पोलिसांचा राहणार बंदोबस्त
ओबीसी एल्गार सभेला एक अप्पर पोलिस अधीक्षक, चार पोलिस उप अधीक्षक, आठ पोलिस निरीक्षक, 25 साहाय्यक व उपनिरीक्षक तसेच एक राज्य राखीव सुरक्षा दलाची तुकडी आणि राखीव पोलिस दलाची दोन पथके तैनात करण्यात येणार आहेत.
हेही वाचा :