झळा टंचाईच्या ! पाणीटंचाईमुळे गव्हाची पेरणी नाही

झळा टंचाईच्या ! पाणीटंचाईमुळे गव्हाची पेरणी नाही

कार्‍हाटी : पुढारी वृत्तसेवा : अपुर्‍या पावसामुळे रब्बी हंगामातील गहू पिकाची पेरणी शेतकर्‍यांना करता आली नाही. अपुर्‍या पाण्यामुळे शेतकर्‍यांना शेतात पीक नसल्यामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. बारामती तालुक्याच्या जिल्ह्यातील भागातील जळगाव सुपे, जळगाव कप, फोंडवाडा, माळवाडी, कार्‍हाटी, देऊळगाव रसाळ, रसाळवाडी आदी भागांत अल्प प्रमाणात पडलेल्या पावसामुळे ओढे, नाले, तलाव कोरडे ठणठणीत आहेत.

विहिरींनी तळ गाठला आहे. सध्या उपलब्ध असलेल्या पाण्यावर जनावरांची चारा पिके घेण्यास शेतकर्‍यांनी प्राधान्य दिले आहे.
मात्र, यंदा खरीप हंगामामधील गहू पिकाची पेरणी करता आली नाही. त्यामुळे भविष्यात गहू टंचाईला सामोरे जाण्याची वेळ आली आहे.
यंदा प्रथमच गहू विकत घेण्याची वेळ शेतकर्‍यावर येणार असल्याचे मत अनिल पवार यांनी व्यक्त केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news