Pune News : सिंहगड-राजगड-तोरणा-लिंगाणा मॅरेथॉन उद्या

Pune News : सिंहगड-राजगड-तोरणा-लिंगाणा मॅरेथॉन उद्या

पुणे : पुढारी वृत्तसेवा : वेस्टर्न घाट रनिंग फाउंडेशनच्या वतीने छत्रपती श्रीशिवरायांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण झाले असून, त्यांच्या महान कार्याला मानवंदना देण्यासाठी तसेच इतिहासाची साक्ष देणार्‍या सिंहगड-राजगड-तोरणा-लिंगाणा किल्ल्यांचे दर्शन घडवण्यासाठी सिंहगड-राजगड-तोरणा-लिंगाणा अल्ट्रा ट्रेल मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष दिग्विजय जेधे यांनी दिली.

अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धा शनिवारी (दि. 9) होणार आहे. सिंहगडाच्या पायथ्यापासून ते तोरणा किल्ल्यापर्यंत ते लिंगाणा सुळक्याच्या पायथ्यापर्यंत या मॅरेथॉनचा मार्ग असणार आहे. नॉर्वे, आइसलँड, फ—ान्स, स्पेन, साऊथ आफि—का, कॅनडा, नेपाळ या 7 देशांतील खेळाडूंसह, भारतातील 24 राज्य आणि 55 शहरांतील एकूण 900 हून अधिक स्पर्धक स्पर्धेत सहभागी झाले आहेत. ही मॅरेथॉन 100 किमी, 53 किमी, 25 किमी व 11 किमी अशा वेगवेगळ्या विभागात घेतली जात आहे.

वेस्टर्न घाट रनिंग फाउंडेशनच्या वतीने या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. पश्चिम घाटातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या या परिसरात ही 100 किमीची मॅरेथॉन स्पर्धा स्पर्धकांसाठी अविस्मरणीय अनुभव ठरणारी आहे. या स्पर्धेत गोळेवाडी (डोणजे) ते सिंहगड 11 किमी, डोणजे-सिंहगड ते राजगड 25 किमी, डोणजे-तोरणा 53 किमी आणि डोणजे ते लिंगाणा 100 किमी अशा चार अंतर श्रेणीमध्ये ही स्पर्धा आहे.

एसआरटीएल ही स्पर्धा वेळेत पूर्ण करणार्‍या स्पर्धकांना फ—ान्समधील यूटीएमबी पात्रतेसाठी आवश्यक गुण मिळतात. महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व विभाग तसेच वन विभाग, पर्यटन विभाग, पुणे पोलिस व पुणे जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या विशेष सहकार्याने ही स्पर्धा होणार आहे. या वर्षी दार्जिलिंगचा हेमंत लिंबू व सोमबहाद्दूर आणि महाराष्ट्रातील देव चौधरी या अव्वल धावपट्टूंनी एसआरटीएल 100 किमी 10 तासांत पूर्ण करण्याचे आवाहन स्वीकारले आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news