Pune News : महापालिका यंदाही करणार पादचारी दिन साजरा | पुढारी

Pune News : महापालिका यंदाही करणार पादचारी दिन साजरा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या वतीने यंदाही 11 डिसेंबर हा दिवस पादचारी दिन म्हणून साजरा केला जाणार आहे.  पादचारी दिनाच्या निमित्ताने महापालिकेकडून लक्ष्मी रस्त्यासह शंभर चौकांत विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.  लक्ष्मी रस्त्यावरील नगरकर तालीम चौक ते उंबर्‍या गणपती चौक आणि गरुड गणपती चौक यादरम्यान सोमवारी पादचारी दिनाचा मुख्य कार्यक्रम होणार आहे. या वेळी मनोरंजनाबरोबरच वाहतूकविषयक जनजागृती केली जाणार आहे. साहसी क्रीडा प्रकाराबरोबरच पथनाट्य, संगीत रजनी अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. हा रस्ता सकाळी नऊ ते सायंकाळी पाचपर्यंत वाहतुकीस बंद असेल. याशिवाय शहरातील विविध व प्रमुख 100 चौकांमध्ये पादचारी दिनाचे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. शहरातील स्वयंसेवी संस्था, पुणे व्यापारी महासंघ, मेट्रो, पीएमपीएल या उपक्रमात सहभागी होणार आहेत.

…असा आहे पर्यायी मार्ग

लक्ष्मी रस्त्याने बेलबाग चौकातून टिळक चौकाकडे जाणारी वाहतूक सेवासदन चौकातून उजवीकडे वळून बाजीराव रस्त्याने जातील.
कुमठेकर रस्त्यावरून लक्ष्मी रस्त्याकडे जाणारी वाहने चितळे कॉर्नर डावीकडे वळून बाजीराव रस्त्याने जातील.
रमणबाग चौकातून उंबर्‍या गणपती चौकाकडे जाणारी वाहने लक्ष्मी रस्त्याकडे न जाता सरळ केळकर रस्त्याने टिळक चौकमार्गे जातील.
निंबाळकर तालीम चौकाकडून कुंठे चौकाकडे जाणारी वाहने लक्ष्मी रस्त्याने न जाता केळकर रस्त्याने टिळक चौकमार्गे इच्छितस्थळी जातील.
हेही वाचा

Back to top button