

पुणे : पुढारी वृत्तसेवा : गरवारे बालभवनच्या संस्थापक-संचालिका, बालमानसशास्त्राच्या अभ्यासिका, लेखिका शोभा भागवत (वय ७६) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्यामागे मुलगा, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. प्रसिद्ध चित्रकार आभा भागवत या त्यांच्या कन्या होत. शोभाताई गेल्या अनेक महिन्यांपासून आजारी होत्या. त्यांनी बालभवन साठी खूप मोलाचे योगदान दिले आहे. त्या लहान मुलांसाठी विविध उपक्रम राबवत. लहान मुलांचे मानसशास्त्राचा सखोल अभ्यास असल्याने त्यांनी बालभवनच्या माध्यमातून नवे मापदंड प्रस्थापित केले. पालकत्वावर त्यांचा विशेष अभ्यास होता.
शोभा भागवत यांनी अनेक पुस्तके लिहिली. त्यात आपली मुलं (मार्गदर्शनपर), गंमतजत्रा (बालसाहित्य), गारांचा पाऊस (मार्गदर्शनपर),बहुरूप गांधी (अनुवादित बालसाहित्य, मूळ इंग्रजी लेखक – अनु बंदोपाध्याय) . या पुस्तकाला जवाहरलाल नेहरूंची प्रस्तावना आहे., मुल नावाचं सुंदर कोडं (मुलांच्या बोलांचे संकलन), विश्व आपलं कुटुंब (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक – कृष्णकुमार). – मार्गदर्शनपर., सारं काही मुलांसाठी (मार्गदर्शनपर) यांचा समावेश आहे.
हेही वाचा