अवैध मासेमारी करणार्‍यांवर कारवाई करा ; आ. दत्तात्रय भरणे यांच्या सूचना

अवैध मासेमारी करणार्‍यांवर कारवाई करा ; आ. दत्तात्रय भरणे यांच्या  सूचना
Published on
Updated on

भिगवण : पुढारी वृत्तसेवा : 'उजनी'तील मत्स्यसंपदा टिकविण्यासाठी अवैध मासेमारीवर कडक कारवाई महत्त्वाची असून, अवैध वाळूच्या धोरणाप्रमाणे कारवाई करा, अशा सूचना आमदार दत्तात्रय भरणे यांनी एका कार्यक्रमात अधिकार्‍यांना केल्या. उजनीतील माशांची चव व ओळख महाराष्ट्राला आहे. ती ओळख टिकविण्यासाठी मत्स्यबीजाचे संगोपन महत्त्वाचे आहे, असे देखील आ. भरणे या वेळी म्हणाले. तब्बल 28 वर्षांनंतर उजनी जलाशयात शासनाच्या वतीने एक कोटी मत्स्यबीज सोडण्यात येणार आहे. रविवारी (दि. 3) पाच लाख मत्स्यबीज भरणे यांच्या हस्ते सोडून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. उर्वरित मत्स्यबीज टप्प्याटप्प्याने सोडण्यात येणार आहे. या वेळी मत्स्य विभागाचे सहआयुक्त (भूजल) रवींद्र वायडा, प्रादेशिक उपायुक्त विजय शिखरे, उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे, तहसीलदार श्रीकांत पाटील, किरण वाघमारे, भीमाशंकर पाटील, प्रताप पाटील, सरपंच उज्ज्वला परदेशी, संजय दरदरे, सचिन बोगावत, अ‍ॅड. पांडुरंग जगताप, शुभम निंबाळकर, अजिंक्य माडगे आदी उपस्थित होते.

या वेळी संजय सोनवणे, विजय नगरे, सीताराम नगरे, चंद्रकांत भोई आदींनी मनोगत व्यक्त केले. उज्ज्वला परदेशी यांनी मच्छीमारांच्या विविध समस्या मांडल्या. आ. भरणे म्हणाले की, 28 वर्षांनंतर धरणात मत्स्यबीज सोडून केलेली वहिवाट यापुढे कायम राहणार आहे. त्यासाठी प्रत्येक वर्षी धरणात मत्स्यबीज सोडण्याची तरतूद जिल्हा नियोजन मंडळातून केली जाणार आहे. सोलापूर व नगर जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन मंडळाकडूनही मत्स्यबीज सोडण्यासाठी व अवैध कारवाईसाठी प्रयत्न राहील. मत्स्यबीज सोडल्यानंतर त्याच्या संगोपनाची जबाबदारी ही भोई व मच्छीमारवर्गाची आहे. आता शासन आपल्याबरोबर आहे. त्यामुळे
लहान जाळ्याच्या साहाय्याने होणारी बेकायदेशीर मासेमारी व प्रतिबंधक मांगूरवर कडक कारवाई होणार आहे; अन्यथा मत्स्यबीज सोडून उपयोग होणार नसल्याचे ते म्हणाले. मासे मोठे झाल्यावर पकडण्याचा सल्ला त्यांनी दिला. मत्स्यबीज आणण्यासाठी प्रशांत हिरे, नंदकुमार नगरे, किरण गिते यांनी परिश्रम घेतले.

…आणि कारवाईची धावपळ
मच्छीमारांच्या उपस्थितीत आमदार भरणे मत्स्यबीज सोडत असतानाच त्यांना समोरच्या किनार्‍यावर लहान मासे मारणार्‍यांची टोळी निदर्शनास आणून दिली. त्या क्षणाला भरणे यांनी उपस्थित अधिकार्‍यांना कारवाईच्या सूचना केल्या आणि क्षणात धावपळ उडाली. बोटीतून अधिकारी कारवाईला गेले; पण टोळीने पळ काढला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news