ग्वाल्हेर-दौंड एक्स्प्रेसला आग; तळेगाव दाभाडे स्थानकाजवळील घटना | पुढारी

ग्वाल्हेर-दौंड एक्स्प्रेसला आग; तळेगाव दाभाडे स्थानकाजवळील घटना

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : ग्वाल्हेर-दौंड सुपरफास्ट एक्स्प्रेसला (गाडी क्रमांक 22194) तळेगाव स्थानकाजवळ आग लागल्याची घटना रविवारी (दि. 3) सायंकाळी चारच्या सुमारास घडली. यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती. या घटनेची माहिती एका ट्विटर वापरकर्त्याने ट्विटद्वारे दिली. याबाबत रेल्वे प्रशासनाने सांगितले की, ग्वाल्हेर-दौंड सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये ब्रेक बाइंडिंगमुळे रेल्वेगाडीच्या बाजूस धूर निघत असल्याची माहिती मिळाली. या माहितीनुसार, दुपारी साडेचारच्या सुमारास तळेगाव स्थानकावर ही रेल्वे थांबविण्यात आली.

रेल्वे कर्मचार्यांच्या प्रयत्नांमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात अखेर यश आले. त्यानंतर पाच वाजता ब्रेक प्रेशर सोडण्यात आले आणि दुरुस्तीचे काम झाल्यानंतर गाडी मार्गस्थ करण्यात आली. त्यानंतर रेल्वे प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र, अचानक रेल्वेगाडीतून धूर निघत असल्याने प्रवाशी नागरिक भयभीत झाले होते.

हेही वाचा

Back to top button