दीडपट परताव्याचे आमिष ; एका क्षणात गमावले 48 लाख | पुढारी

दीडपट परताव्याचे आमिष ; एका क्षणात गमावले 48 लाख

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  एका कंपनीत गुंतवणूक केल्यास दीडपट परतावा मिळेल, असे अमिष दाखवून एका व्यावसायिकाची सुमारे 48 लाख 50 हजार रूपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 20 मे रोजी बालेवाडीतील एका हॉटेलमध्ये घडली. या प्रकरणी संतोष ज्ञानेश्वर पिंजण (45, रा.देहूगाव) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी रियान शेख उर्फ राकेश, सम्राट भाई उर्फ सौरभ दुबे, विनय मेहता, आशिक खान उर्फ बबलू भाई, सुनील यादव (रा. विश्रांतवाडी, पुणे) यांच्यासह एका महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,संशयित महिलेने फिर्यादी संतोष यांना खोटी माहिती देत कंपनीचे नाव न सांगता रियान हा कंपनीचा माणूस असल्याचे सांगितले. कंपनीत गुंतवणूक केल्यास दीडपट परतावा मिळेल, असे आमिष संतोष यांना दाखवले. याबदल्यात संशयितांनी फिर्यादीकडून 49 लाख 50 हजार रुपये घेतले. दरम्यान, त्यातील एक लाख रुपये संशयितांनी आरटीजीएसद्वारे परत दिले. उर्वरित 48 लाख 50 हजार रुपये आणि गुंतवणुकीवरील परतावा न देता फिर्यादी आणि त्यांचा मित्र अफरफ महिरुद्दिन शेख यांची फसवणूक केली.

हेही वाचा :

Back to top button