Pune : खड्ड्यात पडलेल्या गायीला जीवदान | पुढारी

Pune : खड्ड्यात पडलेल्या गायीला जीवदान

बिबवेवाडी : पुढारी वृत्तसेवा :  सातारा रस्त्यावरील डी-मार्ट समोरील महालक्ष्मी अपार्टमेंटच्या परिसरात असलेल्या ओढ्यातील खड्ड्यात एक देशी गीर गाय चरत असताना पडली. अग्निशामक दलाच्या जवानांनी खड्ड्यातून बाहेर काढून या गायीला जीवदान दिले.ओढ्यातील खड्ड्यात गाय पडल्याची माहिती नागरिकांनी बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त प्रकाश गायकवाड यांनी दिली. त्यांनी याबाबत तातडीने अग्निशामक दलाला माहिती दिली. त्यानंतर महापालिकेचा जेसीबी, खासगी क्रेन व अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर या गायीला खड्ड्यातून बाहेर काढण्यात आले. पद्मावती सब स्टेशनच्या अग्निशामक दलाचे जवान, आरोग्य निरीक्षक सचिन पवार, मुकादम किरण वाघमारे आणि महापालिका कर्मचार्‍यांनी गायीला बाहेर काढण्यासाठी परिश्रम घेतले.

Back to top button