file photo
पुणे
Pune Crime Case : बनावट कागदपत्राद्वारे बँकेची 21 लाखांची फसवणूक
पुणे : पुढारी वृत्तसेवा : बनावट कागदपत्रे सादर करून एकाने बँक ऑफ बडोदाची 20 लाख 83 हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अखिल सुभाष पिसाळ (वय 34, रा, कोथरूड) यांनी अलंकार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहुल पाटील (वय 30, रा. आंबेगाव बु.) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ऑगस्ट 2023 ते 10 नोव्हेंबर 2023 दरम्यानच्या काळात घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अखिल पिसाळ हे बँक ऑफ बडोदाच्या कर्वेनगर शाखेत मॅनेजर आहेत. आरोपी राहुल पाटील याने बँक ऑफ बडोदात बनावट कागदपत्रे सादर करून 20 लाख 83 हजारांचे वाहनासाठी कर्ज घेतले. तसेच काही दिवसांनी ते वाहन परस्पर विकून बँकेची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश चव्हाण करत आहेत.
हेही वाचा

