Weather Update  :  आजपासून तीन दिवस पावसाचे

Weather Update  :  आजपासून तीन दिवस पावसाचे

पुणे : पुढारी वृत्तसेवा : बंगालच्या उपसागरात रविवारी 3 रोजी मिचाँग चक्रीवादळाची निर्मीती होत आहे. त्याचा परिणाम देशातील बुहतांश राज्यावर होणार आहे. उत्तर भारत ते महाराष्ट्रापर्यंत हलका पाऊस,थंडी अन दाट धुके असे वातावरण आगामी तीन ते चार दिवसांत पहावयास मिळणार आसल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

नैऋत्य बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ तयार होण्याची प्रक्रीया सुरु झाली आहे. 3 डिसेंबरच्या सुमारास हे वादळ दक्षिण आंध्र प्रदेश पार करीत करानेल्लोर आणि मछलीपट्टणम कडे जाईल. 4 रोजी त्याचा वेग वाढून ते तामिळनाडू किनारपट्टीला धडकण्याची शक्यात आहे. त्यामुळे केरळ, तामिळनाडू व आंध्र प्रदेश या किनारपट्टी भागाला अतिसावधानतेचा इशारा दिला आहे.

अरबी समुद्रा चक्रीय स्थिती..

ईशान्य अरबी समुद्रात चक्राकार वार्‍यांचा वेग वाढला आहे. त्यामुळे ईशान्य मध्य प्रदेशापर्यंत एक कुंड तयार झाले आहे. काही ठिकाणी गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. 3 डिसेंबर रोजी मध्य प्रदेश आणि उत्तर मध्य महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि उत्तर राजस्थानच्या भागात हलका पाऊस व दाट धुके पडण्याची शक्यता आहे.

असे तयार होत आहे चक्रीवादळ…

चक्रीवादळ पुद्दुचेरीपासून सुमारे 440 किमी दक्षिणपूर्व, तर चेन्नईपासून 450 किमी पूर्व-दक्षिणपूर्व भागात तयार होत आहे.ते पुढे दक्षिण-आग्नेय ते पश्चिम-वायव्य दिशेकडे सरकण्याची शक्यता आहे.वादळ 4 डिसेंबर दुपार पर्यंत दक्षिण आंध्र प्रदेश आणि लगतच्या उत्तर तमिळनाडू किनारपट्टीवर येईल.त्यानंतर दक्षिण आंध्र प्रदेश किनार्याजवळ सरकेल. 5 डिसेंबर रोजी दुपारी नेल्लोर आणि मछलीपट्टणम दरम्यान आंध्र प्रदेश डिसेंबर रोजी दुपारी नेल्लोर आणि मछलीपट्टणम दरम्यान आंध्र प्रदेश किनारपट्टी जवळ चक्रीवादळ 80 ते 90 किमी प्रतितास या वेगाने येवून त्याचा वेग100 किमी प्रतितास इतका होईल.

किनारपट्ट्यांना सावधानतेचा इशारा..

केरळ,तामिळनाडू व आंध्र प्रदेशा राज्याच्या किनारपट्टी भागाला सावधानतेचा इशारा 3 ते 5 डिसेंबर दरम्याने देण्यात आला असुरक्षित संरचनेचे नुकसान होण्याची शक्यता असून झोपट्या,विजेच्या तारा,दळणवळणाच्या लाईनवर परिणाम होऊ शकतो त्यामुळे सावधानता बाळगण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

म्यानमार ने दिले मिचाँग हे नाव…

या चक्रीवादळाला 'मिचाँग' हे नाव म्यानमार या देशाने दिलेल्या सूचनेवरून देण्यात आले आहे. मिचाँग या शब्दाचा अर्थ सामर्थ्य आणि लवचिकता असा होतो.चालू वर्षात बंगालच्या उपसागरातील हे चौथे तर हिंदी महासागरात तयार झालेले सहावे चक्रीवादळ असेल.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news