Pimpri News : रिव्हर सायक्लोथॉनच्या पार्श्वभूमीवर भोसरीतील वाहतुकीत बदल | पुढारी

Pimpri News : रिव्हर सायक्लोथॉनच्या पार्श्वभूमीवर भोसरीतील वाहतुकीत बदल

पिंपरी : भोसरी परिसरात इंद्रायणी नदी स्वच्छता अभियान जनजागृती अंतर्गत रिव्हर सायक्लोथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (दि. 3) सकाळी सहा ते दहा या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे. या पार्श्वभूमीवर भोसरी परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त बापू बांगर यांनी याबाबतचे दिले आहेत.

असे असतील बदल

पुणे-नाशिक महामार्गावरूनच चाकणकडे जाणार्‍या वाहनांना बाबर पेट्रोल पंप ते भोसरी ओवर ब्रिज द्वारे पांजरपोळ चौकापर्यंत जाण्यास प्रवेशबंदी असणार आहे. ही वाहने बाबर पेट्रोल पंप चौकातून नाशिक पुणे लेनवरून डाव्या बाजूने पांजरपोळ चौकात जातील.
भोसरी ब्रिजखाली कै. अंकुशराव लांडगे सभागृह ते धावडे वस्तीकडे पुणे नाशिक महामार्गावर जाणार्‍या वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे. ही वाहने यू टर्न घेऊन गुडविल चौकात जाऊन परत यू टर्न घेऊन बाबर पेट्रोल पंप येथे नाशिक पुणे लेनवरून डाव्या बाजूने जातील.

पांजरपोळ चौक ते कृष्णानगर चौक ग्रेड सेपरेटर मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे. ही वाहने कृष्णा नगरकडून पांजरपोळकडे येणार्‍या ग्रेड सेपरेटर मार्गावरून सरदार चौकमार्गे जातील. सरदार चौक ते क्रांती चौक दोन्ही बाजूस वाहतुकीस प्रवेश बंदी आहे. ही वाहने चौकातील इतर पर्यायी मार्गाने जातील. कृष्णानगर चौक ते स्पाईन रोड चौक ग्रेड सेपरेटर मार्गावर वाहनांना प्रवेश बंदी.

ही वाहने सेवा रस्त्याने जातील.

चिखली ओवर ब्रिज येथून क्रांती चौकाकडे जाणार्‍या वाहनांना प्रवेश बंदी. ही वाहने ओवर ब्रिज वरील इतर मार्गाने जातील. स्पाईन चौक ते अनुकूल चौक जाणार्‍या मार्गावर वाहनांना प्रवेश बंदी. ही वाहने एमआयडीसी चौकातून टेल्को रोड मार्गे जातील. अनुकूल चौक ते भोसरी फायर ब्रिगेड कडे जाणार्‍या वाहनांना प्रवेश बंदी. ही वाहने नेहरूनगर हॉकी स्टेडियम मार्गे जातील. भोसरी फायर ब्रिगेड ऑफिस ते गाव जत्रा मैदानाकडे जाणार्‍या वाहनांना प्रवेश बंदी. ही वाहने भोसरी चांदणी चौक मार्गे जातील. पाच किलोमीटर सायकल रॅली मार्ग- गाव जत्रा मैदान-लांडगे पेट्रोल पंप-इंद्रायणीनगर व परत गाव जत्रा मैदान या मार्गावरील वाहतूक टप्प्याटप्प्याने चालू बंद करण्यात येणार आहे. सायकल रॅली मार्गावर असलेल्या सर्व चौकातील वाहतूक आवश्यकतेनुसार टप्प्याटप्प्याने चालू बंद करण्यात येणार आहे.

हेही वाचा

Prajakta Mali : कोल्हापुरी साज अन् प्राजक्ताचं गुलाबी सौंदर्य!

Pimpri News : घोडेस्वारी प्रशिक्षण केंद्रास नागरिकांचा विरोध

Pimpri News : झाडे बनली धोकादायक; उपाययोजनाची नागरिकांची मागणी

Back to top button