चाकण : पुढारी वृत्तसेवा : मोठ्याने शिव्या देण्याचा जाब विचारल्याने दुचाकी पेट्रोल ओतून जाळून टाकली. ही घटना बुधवारी (दि. 29) पहाटे चारच्या सुमारास चाकणमधील खंडोबा माळ येथे घडली. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. लता अरुण जाधव (वय 57, रा. खंडोबा माळ चाकण, ता. खेड) यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी समीर रेहमत अन्सारी (रा. खंडोबा माळ, चाकण) याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर अन्सारी फिर्यादी लता जाधव यांच्या घराजवळ राहतो. फिर्यादी यांचा मुलगा सुहास याने दीड महिन्यापूर्वी समीर अन्सारी याला मोठ्याने शिवीगाळ का करतो, असा जाब विचारला होता.
यावरून त्यांच्यात भांडण झाले होते. फिर्यादी यांनी घरासमोरील शिवाजी ननावरे व रेहमत अन्सारी यांच्या बिल्डिंगच्या भिंतीजवळ त्यांची युनिकॉर्न दुचाकी (एमएच 14 डीएस 1630) पार्क केली होती. समीर अन्सारी याने जुन्या भांडणाचा राग मनात धरून बुधवारी पहाटे फिर्यादी यांच्या दुचाकीवर पेट्रोल टाकून पेटवली. यामध्ये फिर्यादी यांची 70 हजार रुपये किमतीची दुचाकी जळून खाक झाली.
याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून समीर अन्सारी याला अटक केली आहे. घटनेचा तपास चाकण पोलिस करीत आहेत.
हेही वाचा :