

तळेगाव स्टेशन : पुढारी वृत्तसेवा : विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे महाअधिवेशन कोल्हापूर येथे शनिवारी(दि.०२) अध्यक्ष रवि बारई यांचे अध्यक्षते खाली सरचिटणीस आर.टी.देवकांत आणि केंद्रीय कार्यकारणीच्या नियोजनाखाली होत असून या आधिवेशनासाठी राज्यमंत्री दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, विधान परिषद सदस्य शशिकांत शिंदे, सतेज पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तळेगाव दाभाडे सह मावळ परिसरातील वीज महानिर्मिती, महापारेषण,वीज महावितरण कंपन्यातील बहुसंख्य तांत्रिक कामगार अधिवेशनास जाणेसाठी सज्ज झाले आहेत. तेथे उर्जा क्षेत्रातील आव्हाने,वीज ग्राहकांच्या अडचणी,कामगार भरती पेन्शन,तांत्रिक कामगारांच्या अडचणी आदी प्रश्नांवर चर्चा होणार आहे, अशी माहिती वीज महावितरण झोन पुणे अध्यक्ष बाबा शिंदे वीज महापारेषण झोन पुणे सचिव अशोक कलादगी यांनी दिली.