आता पुण्यातही मराठी पाट्या; आदेशाची अंमलबजावणी न केल्यास कारवाई | पुढारी

आता पुण्यातही मराठी पाट्या; आदेशाची अंमलबजावणी न केल्यास कारवाई

पुणे : मुंबईपाठोपाठ आता पुण्यातीलही दुकाने आणि विविध आस्थापनांच्या पाट्या मराठीमध्ये पाहायला मिळणार आहेत. पुणे महापालिकेने दुकाने व आस्थापनांवरील पाट्या मराठीमध्ये करण्यासाठी आदेश काढले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्यांत सर्व पाट्या दुकानदारांनी मराठी स्थानिक भाषेत करावेत, असे आदेश दिले होते.

त्याची मुदत 25 नोव्हेंबर रोजी संपली. मनसेने पुण्यातीलही दुकाने व आस्थापनांच्या पाट्या मराठीमध्ये करण्याची मागणी आयुक्तांकडे केली होती. यानंतर महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने न्यायालयाच्या आदेश व इतर महापालिकांची माहिती घेऊन पुण्यातीलही पाट्या मराठीमध्ये करण्याचे बुधवारी आदेश काढले.

हेही वाचा

’Open AI’ने केली ’क्यू स्टार’ प्रोजेक्टची सुरुवात

Apoorva Hire : अद्वय हिरेंनंतर आता अपूर्व हिरेंवरही गुन्हा दाखल

Black Hole : दर ७६ मिनिटांनी पृथ्वीच्या दिशेने होतो किरणोत्सर्ग

Back to top button