…नाही तर अ‍ॅसिड फेकणार! आईसमोर मुलीला तरुणाची धमकी

…नाही तर अ‍ॅसिड फेकणार! आईसमोर मुलीला तरुणाची धमकी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : आईसोबत बसमध्ये चढणार्‍या तरुणीला मोबाईल नंबर लिहिलेली चिठ्ठी दिली. तिचा हात पकडून 'फोन कर, नाहीतर अ‍ॅसिड फेकेन,' अशी धमकी देणार्‍या अनोळखी तरुणावर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वडगाव शेरी येथे 19 वर्षीय तरुणीने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार पुणे स्टेशन येथील पीएमपीएल बसस्टॉपजवळ 26 नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीला अनोळखी आरोपीने तिच्याजवळ येऊन मोबाईल नंबर मागितला. मात्र, तरुणीने मोबाईल नंबर देण्यास नकार दिला. या वेळी आरोपीने तिचा पाठलाग केला. घाबरलेली तरुणी व तिची आई वडगाव शेरीच्या गाडीत बसण्यासाठी चढत असताना आरोपीने मागून फिर्यादीचा हात धरला. लागलीच त्याने मोबाईल नंबर लिहिलेली चिठ्ठी
फिर्यादीच्या प्लास्टिकच्या पिशवीत टाकून मला फोन कर, फोन केला नाहीस, तर अ‍ॅसिड फेकण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news