कारखान्यांच्या पाण्यामुळे मुठा नदी प्रदूषित | पुढारी

कारखान्यांच्या पाण्यामुळे मुठा नदी प्रदूषित

हिंजवडी : मुळशीच्या डोंगर दर्‍यातून वाहणार्‍या मुठा नदीच्या शुद्धतेबाबत आता शंका घेतली जात आहे. या ना त्या कारणाने नदीपात्रात प्रदूषण होत आहे. त्याबाबत जागरूकता नसल्याने मोठ्या प्रमाणावर या प्रदूषणाची पातळी वाढत आहे. वाकड येथून वाहणार्‍या नदीच्या पात्रात हिरवेगार पाणी दिसत आहे. या नदीच्या वाटेत पिरंगुट, भरे, हिंजवडी एमआयडीसी येत आहे. या तिन्ही एमआयडीसीमध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक उद्योग संबंधित कारखाने आहेत.

त्यामुळे या कारखान्यातील सांडपाणी, रासायनिक पाणी थेट नदीपात्रात सोडले जात असते. परिणामी नदीतील पाण्याच्या प्रदूषणाची पातळीदेखील वाढते. विशेषतः हे पाणी शेती आणि पिण्यासाठी आपरले जात असते. काही ग्रामपंचायतचे फिल्टर प्लांटदेखील या नदीच्या पात्रात आहेत. त्यामुळे या नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्नदेखील यामुळे उपस्थित होत आहे. अशा प्रकारे पाण्याचा रंग अतिशय दूषित पाणी झाल्यानंतर होत असतो, असे मत जाणकारांचे आहे. यासह या पाण्यामध्ये जलपर्णीदेखील नव्याने तयार होत आहे. यामुळे अनेक जलचर प्राण्यांच्या जीवितालादेखील धोका निर्माण झाला असल्याचे नागरिकांचे मत आहे.

हेही वाचा

विकसित भारत संकल्प यात्रेचे खा. श्रीरंग बारणे यांच्या हस्ते उद्घाटन

पिंपरी शहरात घुमला संविधानाचा आवाज

Pune : कचरा डेपो हलविण्यासाठी विद्यार्थिनी करणार उपोषण

Back to top button