

पुणे : चेन्नईहून पुण्याकडे येत असलेल्या भारत गौरव रेल्वेगाडीमधील प्रवाशांना विषबाधा झाली असल्याचे समजते.
या प्रवाशांच्या औषधोपचारासाठी पुणे रेल्वे स्टेशनवर व्यवस्था करण्यात आली असून तसेच ससून रुग्णालयातदेखील प्रवाशांच्या उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान ४० प्रवाशांना विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे.
याघटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या भारत गौरव यात्रा रेल्वेगाडीमध्ये काही प्रवाशांना विषबाधा झाली आहे. त्यामुळे या प्रवाशांवर उपचार करण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मध्यरात्रीच्या दरम्यान ही विशेष रेल्वे गाडी पुणे रेल्वे स्टेशनला आली होती. तेव्हा प्लॅटफॉर्मवरच विषबाधा झालेल्यांवर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर विषबाधा झालेल्या प्रवाशांना ससून रुग्णालयात हलविण्यात आले. ससून रुग्णालय प्रशासनाला ४० बेड तयार ठेवण्यास सांगण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांमधील खानपान सुविधा, पेन्ट्री कार काढून टाकल्याने लोकांना ताजे अन्न मिळत नाही. खाण्यापिण्याची असुविधा त्यामुळे प्रवाशांना अनेकदा सकाळचे फुड पॅकेट हे सायंकाळी, रात्री देण्यात येते. त्यातून अशा दुर्घटना घडण्याची शक्यता जास्त असते. रेल्वेने पुन्हा पेन्ट्रीकार सुरु कराव्यात, असे रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी सांगितले आहे. जेणेकरून अशा समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.
हेही वाचा