शहरीकरणामुळे बिल्डर लॉबी मजबूत झाली आहे. बांधकाम साईटवर अपघात झाल्यानंतर बिल्डर स्थानिक प्रशासनाला मॅनेज करून एका रात्रीत मयत व्यक्तीचे प्रेत व सर्व स्थलांतरितांना रात्रीमध्ये मूळ गावी पोहोच केले जाते. परिणामी, कामगार नुकसानभरपाई कायद्यांतर्गत द्याव्या लागणार्या भरपाईपासून ते वाचतात. शिवाय कामाच्या ठिकाणी सुरक्षेची साधने नसल्यास कामगार विभाग काम बंद ठेवण्याचे आदेश देऊ शकतात. मात्र, आजवर बांधकाम विभागाने कोणालाही काम बंद ठेवण्याचे आदेश दिलेले ऐकिवात नाही. त्यामुळे बांधकाम साईटवर अपघात झाल्यानंतर मुख्य मालक व मुख्य बिल्डरवर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी आम्ही वारंवार आंदोलने केली आहे. आमच्या आंदोलनाला यश येत असतानाच बिल्डरांची लॉबी सत्ताधार्यांना भेटली आणि बिल्डरांना अभय मिळाले आहे.– नितीन पवार, सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश बांधकाम मजूर सभा