Pune Drugs Case : रवींद्र धंगेकर उतरणार रस्त्यावर | पुढारी

Pune Drugs Case : रवींद्र धंगेकर उतरणार रस्त्यावर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ड्रगतस्कर ललित पाटील प्रकरणात मुख्य आरोपींवर कडक कारवाई करण्याऐवजी त्यांची पाठराखण केली जात आहे. त्यामुळे राज्य सरकार, पोलिस प्रशासन यांच्या विरोधात आमदार रवींद्र धंगेकर रस्त्यावर उतरणार आहेत. याप्रकरणी बुधवारी (ता. 29) पोलिस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती धंगेकर यांनी दिली. गृहमंत्री या प्रकरणाकडे कानाडोळा करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

धंगेकर म्हणाले, ’चौकशी समितीच्या अहवालात दोषी आढळून आलेले ससूनचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांना केवळ पदमुक्त करण्यात आले आहे. पोलिसांनी मोक्कांअंतर्गत कारवाई करून त्यांना अद्याप अटक केली नाही. पैशांची देवाणघेवाण करणारा त्यांचा सहकारी कर्मचारी महेंद्र शेवते यालाही अटक झाली नाही. कारागृह प्रशासनाची कसून चौकशी झाली नाही. एकूणच याप्रकरणी सर्व दोषींना पाठीशी घालण्याचे काम सुरू आहे.’

‘ललित पाटील प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे लक्ष घालत नाहीत. त्यांनी लक्ष घातले असते, पोलिसांनी वेळेवर तपास केला असता, तर रस्त्यावर उतरण्याची वेळ आली नसती,’ असे सांगून धंगेकर म्हणाले, ‘चौकशीच्या मागणीसाठी आम्ही पोलिस आयुक्तांनाही अनेकदा
भेटलो. ते हसतमुख आहेत. पण, याप्रकरणी त्यांनी आता गंभीर होण्याची गरज आहे.’

हेही वाचा

नाशिकमध्ये अवकाळी पावसाचा जोर ओसरला, पुढील २४ तास येलो अलर्ट

खंडपीठाबाबत शासन सकारात्मक : चंद्रकांत पाटील

Weather forecast: आणखी दोन दिवस पाऊस, त्यानंतर धुक्याची चादर

Back to top button