Pune News : राज्य शिक्षकेतर महामंडळावर शिवाजी खांडेकरांची सत्ता

Pune News : राज्य शिक्षकेतर महामंडळावर शिवाजी खांडेकरांची सत्ता

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळ यांची त्रैवार्षिक निवडणूक पुण्यातील राष्ट्र सेवा दलाच्या रावसाहेब पटवर्धन विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, साने गुरुजी स्मारक येथे पार पडली. या निवडणुकीत पुन्हा एकदा शिवाजी खांडेकर यांच्यावर शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी विश्वास कायम ठेवत एकहाती सत्ता दिली आहे.

खांडेकरांच्या नेतृत्वाखाली महामंडळाच्या निवडणुकीत 14 जागा बिनविरोध निवडून आल्या असून, उर्वरित 3 जागांवर झालेल्या निवडणूक प्रक्रियेत तिन्ही उमेदवार बहुसंख्य मतांनी विजयी झाले आहेत. यामध्ये अनिल रामचंद्र माने (सातारा) अध्यक्षपदी बिनविरोध, शिवाजी चंद्रकांत खांडेकर (पुणे) सरकार्यवाहपदी चौथ्यांदा बिनविरोध, मोरेश्वर इसनाजी वासेकर (चंद्रपूर) कार्याध्यक्ष बिनविरोध, रवींद्र राजाराम गवळी (सांगली) उपाध्यक्ष बिनविरोध, सरिता विजयकुमार कुलकर्णी (नांदेड) बिनविरोध, प्रिया प्रमोद पवार (मुंबई) उपाध्यक्ष बिनविरोध, देविदास सोनाजी पंडागळे (मुंबई शहर),

मुंबई उपकार्यवाह बिनविरोध, गोवर्धन गोविंद पांडुळे (अहमदनगर), पुणे उपकार्यवाह बिनविरोध, गजानन द्वारकानाथ नानचे (सिंधुदुर्ग), कोल्हापूर उपकार्यवाह बिनविरोध, जीवनदास रघुनाथ सार्वे (भंडारा) उपकार्यवाह बिनविरोध, विजय महादेव ताले (अकोला) अमरावती उपकार्यवाह बिनविरोध, राजेश्वर शिवराज चापुले (लातूर) लातूर उपकार्यवाह बिनविरोध, श्रीकांत जोतिराम पावणे (सोलापूर) प्रसिध्दीप्रमुख, रामचंद्र चिंतामणी केळकर (रत्नागिरी) अंतर्गत हिशेबनीस बिनविरोध, श्रीधर जयवंत गोंधळी (कोल्हापूर) उपाध्यक्ष विजयी मते 134, खैरुद्दीन नजरुद्दीन सय्यद (धाराशिव) उपाध्यक्ष विजयी मते 131 ,नाशिक उपकार्यवाहपदी ज्ञानेश्वर पंडित महाले (नंदुरबार) विजयी मते 122, संभाजीनगर उपकार्यवाहपदी संजय सदाशिव कावळे (संभाजीनगर) विजयी मते 129 निवडून आले आहेत.

ताकदीने लढा उभारणार

जुनी पेन्शन योजना, शिक्षकेतर सेवकांचे प्रश्न, शैक्षणिक धोरण व त्यातील अडचणी सोडविण्यासाठी राज्य शिक्षकेतर महामंडळाच्या वतीने मोठ्या ताकदीने लढा उभारून न्याय देणार असल्याचे नवीन पदाधिकार्‍यांनी सांगितले. या वेळी राज्य महामंडळाचे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून प्रसन्न कोतुळकर यांनी आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी रमेश इंगवले, देवेंद्र पारखे, इम—ाण मुल्ला, नीलेश पारकर, रामगोंडा खोत यांनी काम पाहिले. पुणे जिल्हाध्यक्ष विनोद गोरे यांनी आभार मानले.

हेही वाचा

logo
Pudhari News
pudhari.news