Pune : मुंबईवरील 26/11 हल्ल्यातील शहिदांना मानवंदना ! | पुढारी

Pune : मुंबईवरील 26/11 हल्ल्यातील शहिदांना मानवंदना !

पुणे : पुढारी वृत्तसेवा : स्वारगेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत पुणे शहर पोलिस दल आणि सेवा मित्रमंडळ ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील 26/11 हल्ल्यातील शहिदांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. या वेळी शहिदांच्या स्मरणार्थ चित्रकला स्पर्धेचे व खाऊवाटपाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, प्रवीणकुमार पाटील, उपायुक्त आर. राजा, स्मार्तना पाटील, विक्रांत देशमुख, संभाजी पाटील, आमदार रवींद्र धंगेकर, सहायक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर तसेच स्वारगेट आणि खडक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पोलिस आयुक्तालयातील अधिकारी आणि अंमलदार तसेच सेवा मित्रमंडळाचे शिरीष मोहिते व पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी आयोजित चित्रकला स्पर्धेत सुमारे 7 ते 8 हजार वेगवेगळ्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

Back to top button